Tuesday, July 9, 2024

भारीच ना! उर्वशी रौतेलाने केला स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ शेअर; बघता बघताच पडला लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘डूब गये’ हे गाणे रिलीझ झाले होते. त्यानंतर, आता तिचे ‘वर्साचे बेबी’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे नवीन गाणे ही सोशल मीडियावर जोरदार धमाल करत आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये ती इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानच्या सोबत दिसली आहे.

उर्वशी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि सतत तिचे पोस्ट्स शेअर करत राहते. आता पुन्हा अभिनेत्रीने तिचा एक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. उर्वशीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

उर्वशी रौतेलाने स्काय डायव्हिंगचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “नवीन यूट्यूब स्काय डाइव्ह व्हिडिओ. लिंक बायोमध्ये आहे.” उर्वशीने या कॅप्शनद्वारे सांगितले आहे की, तिने तिच्या स्काय डायव्हिंगचा हा पूर्ण व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, स्काय डायव्हिंग करताना उर्वशी खूपच आनंदी दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. दुसरीकडे २ हजारांहून अधिक कमेंट्सही या व्हिडिओला मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजर लिहिले आहे की, “एन्जॉयमेंटच एन्जॉयमेंट.”

लेटेस्ट म्युझिक अल्बम ‘वर्साचे बेबी’च्या यशानंतर उर्वशी रौतेलाने अलीकडेच जाहीर केले होते की, या गाण्याची सर्व कमाई ती ‘कोविड रिलीफ फंड’ मध्ये देणार आहे. उर्वशीच्या या उदात्त कृतीचे चाहत्यांकडून खूप कौतुक झाले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती जिओ स्टुडिओच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा