Wednesday, July 3, 2024

रिषभ पंतच्या नावाचं कुंकू भरुन उर्वशीने शेअर केले फोटो! चाहतेही म्हणाले, “गोष्ट लग्नापर्यत पोहोचली”

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमी आपल्या नवीन फोटोमुळे आणि स्टईलमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट पटू रिषभ (Rishabh Pant) पंत आणि उर्वशी यांच्यातील सोशल मीडियावर वाद चांगलाच पेटला होता. यानंतर तिने आशिया कप चशकातील भारत वर्सेस पाकिस्तान या सामन्याला थेट दुबईमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे उर्वशीला जोरदार ट्रोल केले होते. आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. तिने नुकतंच आपला एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उर्वशी काहि दिवसांपासून इंटरनेट वॉरमुळे खुपच चर्चेत आली होती. सध्या ती चित्रपट आणि सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती मिस युनिवर्स होउन गेली आहे त्यामुळे भारतच नाही तर हॉलिवूडसुद्धा उर्वशीचा फॅन आहे. तिने नुकतंच आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा अकदा तिच्या चर्चांना उधान आहे. तिच्या फोटोवर लाखो चहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटोमध्ये ती साडी घलताना दिसून येत आहे, सोबतच तिने भांगेत कुंकु देखिल लावलेले दिसून येत आहे. ती सध्या अभिनेत्री ऑस्ट्रेलियात असून रिषभ पंतही आपल्या भारतीय क्रिकेट टीम टी20 विश्व कप 2022 साठी ऑस्ट्रेलियामध्ये आला आहे. त्यामुळे उर्वशीही तिथेच आहे आणि सोशल मीडियावर अशी पोस्ट पाहून चाहते वेगळाच अंदाज लावत आहेत. हे दोघेही एतकाच ठिकाणी असल्यामुळे चाहतेही या फोटोवर चांगल्याच प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अभिनेत्रीने फक्त फोटोच नाही तर सोबत दिलेले मोठेलठ दिलेले कॅप्शन देखिल चाहत्यांना विचार कण्यास भाग पाडत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रेम में पड़ी प्रेमिका के लिए सिंदूर से प्रिय कुछ नहीं होता है…सारी रस्म रिवाज के साथ चाहिए, उम्र भर का साथ पिया तुमसे..” असे कॅप्शन देत पुढे हर्टवले एसोजी दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

अभिनेत्री उर्वशीने हा फोटो शेअर केल्या केल्या लोखो लोकांनी लाईक केले आहे, आणि सोबतच तिला कमेंटमध्ये भलतेच प्रश्न देखिल विचारत आहेत. एका युजरने लिहिले होते की, “आता रिषभ पंतला सोडून दे, टी 20 विश्व कप झाल्यानंतर तुम्हा दोघांचे लग्न करुन देऊ.” आणि दुसऱ्या युजरने लिहिले होते की, “रिषभ भाऊ गोष्ट लग्नापर्यत पोहोचली आहे. शुभेच्छा रिषभ भऊ आणि उर्वशी.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत असे समजले आहे की, हा फोटो रिषभसाठी शेअर केला आहे. असे असले तरी उर्वशी उलट उत्तर देण्यासाटी कधीच मागे सरकली नाही. मात्र या फोटोवर रिषभ पंतकडून अजून काहीच प्रतिक्रिया आली नाही. आता रिषभची प्रतिक्तिया पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक अहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आई-वडील होताचं नयनतारा आणि विघ्नेश अडचणीत, तमिळनाडूच्या मंत्र्यांचे निर्देश
शालिनला धक्का देणं पडलं महागात, बिग बॉसने दोन आठवड्यांसाठी दिली ‘ही’ शिक्षा

हे देखील वाचा