Wednesday, July 3, 2024

स्लो मोशन स्टाईलमधील उर्वशी रौतेलाचा खास व्हिडिओ आला समोर; ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते झाले फिदा!

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी आपल्या अदांनी चाहत्यांची मने जिंकते. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची स्टाईल अगदी पाहण्यासारखी आहे. चाहत्यांसोबतच इतर कलाकारही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

तसे, उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टेटमेंटबद्दल चर्चेत असते. त्याचप्रमाणे या व्हिडिओमधीलही तिचा डिझायनर ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिने यात क्रॉप टॉप आणि मॅचिंग शॉर्ट जॅकेटसह, राखाडी रंगाचा हाई अँड लो स्कर्ट घातला आहे. याव्यतिरिक्त, तिने पारदर्शक हाय हिल्स देखील घातली आहे. यासोबत तिने हातात एक डायमंडची अंगठी घातलेली पाहायला मिळाली आणि स्पार्कल नेल पेंटही तिच्या हातावर अगदी उठून दिसत आहे. या सर्वांसोबत डोळ्याला लावलेल्या काळ्या चष्म्याने तिचा लूक पूर्ण केला आहे.

उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आता गुरु रंधावासोबत तिचे एक गाणे येणार आहे. हे दोघे ‘डूब गये’ या म्युझिक व्हिडिओमध्ये खूपच रोमँटिक स्टाईलमध्ये दिसणार आहेत. हा म्युझिक व्हिडिओ रेमो डिसूझाने दिग्दर्शित केला आहे आणि बी प्राकने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. टी सीरिजच्या बॅनरखाली हे गाणे ३० एप्रिल रोजी रिलीझ होणार आहे. तसेच, गुरु रंधावा आणि उर्वशीच्या जोडीला चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. दोघांचेही चाहते उत्सुकतेने या म्युझिक व्हिडिओची वाट पाहत आहेत.

उर्वशीने ‘हेट स्टोरी 4’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय आता ती टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे. तिने सनी देओलसोबत ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, थोडे ऑक्सिजन लोकांमध्ये वाटा’, राखी सावंतचे ‘पंगा क्वीन’ला आवाहन

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा