Thursday, July 18, 2024

ऋषभ पंतच्या नावाने पुन्हा ट्रोल झाली उर्वशी रौतेला, पण सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीनेही केली बोलती बंद!

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने फिल्मी दुनियेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्वशी चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये अधिराज्य गाजवते. पण विशेष बाब म्हणजे, ही अभिनेत्री ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देखील ओळखली जाते. अलीकडेच, उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर ४५ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत आणि या खास प्रसंगी, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती धोकादायक स्टंट करताना दिसली.

या व्हिडिओमध्ये उर्वशीचा निडर अंदाज चाहत्यांना खूप आवडला. पण इथेही एका युजरने तिला ट्रोल करायला सुरुवात केली. युजरने तिला क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नावाने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर अभिनेत्रीनेही युजरला सडेतोड उत्तर दिले.

खरंतर, एका युजरने उर्वशी रौतेलाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “काल पंतचे १०० पाहिले की नाही.” यावर उर्वशीने युजरला सडेतोड उत्तर दिले. या कमेंटला प्रत्युत्तर देताना अभिनेत्रीने लिहिले, “अरे तुझे म्हणणे पँट (पँट इमोजीसह) आहे का! होय माझ्या लक्षात आले, कारण प्रत्येकजण ते घालतो. आणि हो मला त्यात १०० रुपयेही मिळाले.”

एक काळ असा होता, जेव्हा उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांची नावे एकत्र घेतली जात होती. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावाही केला जात होता. मात्र, दोघांनीही या अफवांचे खंडन केले नाही. या सगळ्यामध्ये एके दिवशी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतने अचानक एकमेकांना इंस्टाग्रामवर ब्लॉक केले. याचे कारण दोन्ही बाजूंनी अद्यापही सांगण्यात आले नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, उर्वशी रौतेला ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये उर्वशीसोबत रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुत्तू पायले २’ या थ्रिलर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. उर्वशी ‘द लीजेंड’ या बिग बजेट चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा