बॉलीवूड मधील ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौटेला. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलीवूडमध्ये तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी खूपच स्टाइलीश दिसत आहे.
उर्वशी रौटेला हिने तिचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता कि, ती मुंबई एअरपोर्टवर आहे. तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे, आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत आणि केसांचा पोनीटेल बांधला आहे. तिचा हा स्टाइलिश अंदाज बघून चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ पडली आहे. सगळेजण तिच्या या लूकचे खूपच कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोरोनाचे सगळे निर्बंध पाळत उर्वशी रौटेलाने तिच्या तोंडावर काळया रंगाचा मास्क घातला आहे. आणि ती सोशल डिस्टंसिंगचे पालन करताना देखील दिसत आहे. उर्वशी तिच्या स्टाइलिश ड्रेसमुळे नेहमीच सगळ्यांच्या चर्चेत असते. तिचा हा गुलाबी रंगाचा ड्रेस देखील प्रेक्षकांना आवडला आहे. उर्वशी रौटेला हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या ‘रणदीप हुड्डा’ यांच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.










