Saturday, June 29, 2024

‘हे तर श्रीमंतांचं हेल्मेट’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातलेल्या डायमंड मास्करेडवर युजर्सची प्रतिक्रिया

उर्वशी रौतेला अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करत असते. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो बराच व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून उर्वशीच्या या अवताराचे खूप कौतूक तर होतच आहे, पण दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोलही करत आहेत.

खरं तर, सोशल मीडियावर उर्वशीचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये उर्वशीने डायमंड मास्करेड परिधान केले आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्वशी म्हणाली की, तिच्या चेहर्‍यावर लावलेले डायमंड मास्करेड खूपच जड होते.

उर्वशीचा हा अवतार काही चाहत्यांना खूप आवडत आहे. पण त्याचवेळी काहीजण तिला खूप ट्रोलही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून बर्‍याच चाहत्यांनी उर्वशीचे ‘खूप सुंदर’ म्हणून वर्णन केले आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, यात उर्वशी एखाद्या परीसारखी दिसत आहे. त्याचवेळी ट्रोलर्स म्हणत आहेत की, ‘हे श्रीमंतांचे हेल्मेट आहे.’

उर्वशीच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने सनी देओलसोबत ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी’, ‘पागलपंती’, ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात दिसली आहे. यासोबत, लवकरच उर्वशी तमिळ चित्रपटांमध्येही पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा