छोट्या पडद्यावरील उतरन मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या मालिकेने अभिनेत्री टीना दत्ताला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली होती. सध्या टीना दत्ताचा (Tina Datta) एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी केलेला उपाय पाहून चाहत्यांचेही डोळे फिरले आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
‘उत्तरन’ या मालिकेत इच्छाची भूमिका साकारणारी अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने गरमी टाळण्यासाठी असा उपाय शोधला आहे की सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री चक्क फ्रीजमध्ये बसून स्वत:ला गरमी पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या फोटोंमध्ये टीना दत्ता फ्रीजमध्ये बसून सफरचंद खाताना दिसत आहे. अभिनेत्री फ्रीजच्या रेफ्रिजरेटरमध्ये बसून आराम करताना दिसत आहे. टीनाचे फ्रीजमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये टीनाची स्टाइल आणि तिचा लूकही पाहण्यासारखा आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
हे फोटो स्वतः टीना दत्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करता टीनाने ‘फ्रिजमध्ये बसून सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरांपासून दूर राहता येणार नाही तर उष्णतेपासूनही दूर राहाल. असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. टीना दत्ता सतत तिच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि घायाळ करणारा लूक पाहून चाहते नेहमीच फिदा होताना दिसत असतात.
View this post on Instagram
दरम्यान ‘उत्तरन’ या मालिकेत इच्छाची भूमिका साकारून टीना दत्ताला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत अभिनेत्री एका साध्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या व्यक्तिरेखेने टीना दत्ता इतकी लोकप्रिय केली की आजही लोक तिला इच्छा या नावानेच हाक मारतात. या मालिकेनंतर टीना अनेक मालिकांमध्ये दिसली असली तरी इच्छा ही व्यक्तिरेखा सर्वाधिक प्रसिद्ध झाली. टीना शेवटची ‘दायन’ या मालिकेत दिसली होती.