आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच वैदेही परशुरामी. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री नृत्य कलेतही पारंगत आहे. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर बरेच नाव कमावले आहे. वैदेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, नेहमीच ती चाहत्यांचे लक्ष वेधते. आता पुन्हा वैदेहीचा एक फोटो चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत आहे. ज्यासोबतचे कॅप्शनही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.
वैदेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने करड्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. कानात इअरिंग घालून, तिने सगळे केस मागे बांधले आहेत. यातील तिचा मेकअपही अगदी साधा दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोपेक्षा त्याखालील प्रेरणादायी कॅप्शन चर्चेत आलं आहे. (vaidehi parshurami gives positive msg to fans with latest post)
हा फोटो शेअर करत वैदेही म्हणतेय की, “फक्त रेकॉर्डसाठी सांगतेय डार्लिंग, सगळे सकारात्मक बदल सुरुवातीला सकारात्मक वाटत नाहीत.” अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अगदी कमी कालावधीत या फोटोवर २६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये चाहते तिच्यात सौंदर्याचे आणि कॅप्शनचे भरभरून कौतुक करत आहेत.
वैदेहीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन अभिनित ‘वझीर’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय ‘सिम्बा’मध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री लवकरच ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत