Thursday, November 13, 2025
Home अन्य वैशाली ठक्करच्याच्या 5 पानांच्या पत्राने केला मोठा खुलासा! ‘या’ कारणामुळे घेतला होता गळफास

वैशाली ठक्करच्याच्या 5 पानांच्या पत्राने केला मोठा खुलासा! ‘या’ कारणामुळे घेतला होता गळफास

टेलिव्हिज अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने रविवार ( 16 ऑक्टोंबर ) दिवशी गळफास लावून आपल्या राहत्याघरी इंदोरमध्ये आत्माहत्या केली होती. याचे कारण आद्याप समजले नव्हते. मात्र, वैशालीने जाण्यापूर्वी एका पत्रामध्ये आपल्यासोबत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती देऊन गेली होती. तिने आत्माहत्या करण्यापूर्वी आपल्या मनातील दु:ख एका पत्राद्वारे लिहून ठेवले होते, तिच्या मृतदेहासोबत ते पत्र मिळाले होत. मात्र, त्यामध्ये काय लिहिले आहे, याचा खुलासा करण्यात आला आहे. 

आई-बाबा,
बास झालेना आता.. तुम्ही खूप चिंता केली माझ्यासाठी आणि मी स्वत:साठी. फक्त मलाच माहित आहे की, या दोन वर्षामध्ये मी काय काय सहन केलं आहे. राहुल नवलीनीने माझ्यासोबत काय काय चुकीचं केलंय, हे मी सांगूही शकत नाही. कशाप्रकारे माझे शोषण शोषण केले इमोशनली आणि फिजीकली मला अपमाणित केले, आणि शेवटी त्याने मला सांगितले होते की, “मी तुझे लग्न नाही होउ देणार”, आणि त्याने तेच केले. आता कुणाशी भांडू. मीच त्याला माझ्या एवढं जवळचं मानलं होतं, पण त्याने मलाच माझ्यापासून लांब केलं.

शेवटी मी रितेश आणि माझ्या नात्यामुळे खुश झाले होते, पण त्याने या नात्यालाही तोडून टाकले. बास आता, थकले मी, आता मला काहीच नको. राहुल आणि त्याच्यासोबत सामील असलेल्या लोकांनी माझ्या आयुष्याचे जे काही वाटोळं केलं आहे , त्यांच्या कर्माचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. पण मी इथे राहूलच्या पत्नीसाठी लिहिणार आहे की, तिला राहूलचे सगळे सत्य माहित असूनही तिने सगळ्यांसमोर मला चुकिचे ठरवले. कारण ती फक्त स्वत:चे घर वाचवण्याचा प्रयत्न करत होती, आणि याच गोष्टीचा राहूलने फायदा घेतला की, तिचे तर काहीच बिघडणार नाही मात्र, माझे आयुष्य खराब करु शकेल. मी त्याला शिक्षा तर नाही देउ शकले, पण मला विश्वास आहे की, देव आणि कायदा त्याला नक्कीच शिक्षा देइल. या सगळ्यामध्ये मी माझ्या आई-वडीलंना त्रस्त नाही पाहू शकत. मुलगी नाही राहिली तर तिच्याशी जुळलेल्या गोष्टांचा त्रासही नही राहणार.

आय क्वीट आई
आय लव्ह यू आई-बाबा. मला माफ करा कारण मी एक चांगली मुलगी नव्हते. प्लीज राहुल आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा द्या. राहुल आणि दिशाने मला अडीज वर्षापासून मानसिकरित्या त्रास दिला आहे. तुम्ही खुश राहा नाही तर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. माझी शप्पत आहे.
आय लव्ह यू आणि मितेशला आय याम सॉरी.
आय क्वीट…वैशाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते’, अमोल कोल्हेंच्या पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव
‘मजहब इंसानों के लिए बनता है…’, ओम पुरींचे ते डायलॉग, जे आजही चाहत्यांच्या मनावर करताहेत राज्य

हे देखील वाचा