Wednesday, July 3, 2024

‘जर तुम्ही भाग्यवान असाल, तर…’, म्हणत ऋता दुर्गुळेने प्रतिकसाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लिहिली रोमॅंटिक पोस्ट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (hruta durgule) तिचा बॉयफ्रेंड असलेल्या प्रतिक शाहसोबत काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याची फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. या दोघांवर त्यांच्या चाहत्यांनी, मित्र परिवाराने आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेली आणि अनेक तरुणांची क्रश असलेल्या ऋताने साखरपुडा केल्याने अनेक मुलांचे मनं देखील खट्टू झाले होते. मात्र त्यांच्या साखरपुड्यानंतर ऋता आणि प्रतिकची जोडी तुफान गाजताना दिसत आहे. नुकताच व्हॅलेंटाइन डे साजरा झाला. या दिव्सचाहे औचित्य साधत अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांचे प्रेम व्यक्त करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

ऋताने देखील सोशल मीडियावर प्रतिकसाठी एक खास आणि सुंदर पोस्ट शेअर करत दोघांचा एक रोमँटिक फोटो देखील पोस्ट केला. ऋताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रेम विजेसारखे येते आणि त्याच प्रकारे अदृश्य होते. जर तुम्ही भाग्यवान असाल, तर ते तुमच्यासोबत रहाते. जर नाही, तर तुम्ही तुमचं आयुष्य अशा माणसाच्या प्रतिक्षेत जाईल तो तुमच्याकडे नाही.” – चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी! मी खूप भाग्यवान आहे. तुझ्याबद्दल सदैव कृतज्ञ असेन.”

ऋताने ‘दुर्वा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. सध्या ऋता झी मराठीवरील ‘मन ऊडू ऊडू झाले’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून, त्याशिवाय ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातही ती काम करते आहे. तर प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. इतकेच नाही तर ऋताच्या होणाऱ्या सासूबाई मुग्धा शाह देखील एक उत्तम अभिनेत्री असून त्या मराठी आणि गुजराती मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. मुग्धा यांनी ‘बे दुणे साडेचार’, ‘मिस मॅच’, ‘असंभव’ या मराठी मालिकांमध्ये काम केले असून, ऋताने देखील मुग्धा यांच्यासोबत काम केले आहे.

  • हे ही पाहा :

 

हे देखील वाचा