Wednesday, July 3, 2024

अनुष्कासोबत मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या वामिकाने केले विराटला चियर, फोटो झाला व्हायरल

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कपल नेहमीच फॅन्ससाठी आकर्षणाचा विषय असतो. या दोघांचे फॅन्स सतत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जेव्हा अनुष्का आणि विराट आईबाबा झाले तेव्हापासूनची त्यांच्या मुलीला बघण्यासाठी आतुर झाले आहेत. पॅपराजी देखील अनेकदा वामिकाला त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र आता वामिका वर्षाची होईल मात्र अजूनही अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचा चेहरा काही लोकांसमोर आणला नाही. अनुष्का आणि विराट अनेकदा वामिकाचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. मात्र तिचा चेहरा काही ते दाखवत नाही.

सध्या विराट दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी सामने खेळण्यांमध्ये व्यस्त असून, विराटच्यासोबत वामिका आणि अनुष्का देखील आहे. अनुष्का नेहमीच विराटला त्याच्या सामन्यांदरम्यान चिअर करताना दिसते. या कसोटी सामन्यादरम्यान देखील अनुष्का स्टॅन्डमध्ये बसून विराटला पाठिंबा देताना दिसली. मात्र यावेळेस तिच्यासोबत छोटी वामिका देखील होती. सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि वामिकाचा एक गोड फोटो तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये वामिका अनुष्काच्या मांडीवर बसली असून, तिच्या दोन क्युट वेण्या घातल्या आहेत. ती तिच्या आईसोबत तिच्या बाबांना चियर करत आहे. अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या मुलीचे फोटो सार्वजनिक न करण्यासाठी पॅपराजीना देखील विनंती केली असून, पॅपराजी देखील त्यांची विनंती मेनी करताना दिसतात. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये देखील वामिकाचा चेहरा एका हार्ट इमोजीने झाकण्यात आला असून, हा फोटो विराट आणि अनुष्काच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

काही काळापूर्वीच अनुष्काने मीडिया आणि पॅपराजी यांचे आभार मानले वामिकाचे फोटो मीडियामध्ये पोस्ट न केल्याबद्दल तिने सर्वाना धन्यवाद म्हटले होते.

हेही वाचा :

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ऑडिशनमधील विजेत्या कलाकारांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…

शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य

हे देखील वाचा