Monday, July 1, 2024

वन्नियार समाजाने ‘जय भीम’च्या टीमला पाठवली नोटीस, माफीसह तब्बल पाच कोटी रुपयांची केली मागणी

वन्नियार संगमचे राज्य अध्यक्ष अभिनेता पुथा अरुलमोझी यांनी सूर्या, ज्योतिका, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी आणि त्यांनी बदनामीकारक म्हटलेली सर्व सीन काढून टाकावीत, अशी मागणी केली आहे. यासोबतच आठवडाभरात पाच कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अमेझॉन प्राइम व्हिडिओवर २ नोव्हेंबरला सूर्याचा ‘जय भीम’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात इरुलर समुदायाची जमात आणि त्यांना कोठडीत कसे छळले गेले याचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात, हिंदी भाषिक लोक एका सीनमुळे त्रासले होते. ज्यात प्रकाश राज एका माणसाला हिंदीत बोलल्याबद्दल चापट मारताना दाखवले आहेत. पाठवलेल्या नोटीसमध्ये एका कॅलेंडरवर अग्नी कुंडम दिसत असलेल्या सीनचा उल्लेख आहे. वास्तविक, अग्नि कुंडम हे वाण्यारांचे प्रतीक आहे. पाठवलेल्या नोटीसमध्ये, निर्मात्यांनी जाणूनबुजून कॅलेंडर ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, राजकन्नूला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पात्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीचे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सूर्याचे विधान
सूर्याने एक निवेदन जारी केले आहे की, त्याचा चित्रपट आणि त्याचा कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ज्यानंतर सूर्याच्या चाहत्यांनी ‘जय भीम’च्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ट्विटरची मदत घेतली आणि ट्विटरवर #WeStandWithSuriya ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

५ कोटींची केली मागणी
पट्टाली मक्कल काची कायदेशीर शाखेचे प्रमुख अधिवक्ता बाळू यांनी कायदेशीर नोटीसमध्ये नमूद केले आहे की, पु था अरुलमोझी (वन्नियार संगमचे राज्य अध्यक्ष) यांच्या मते ‘जय भीम’मधील काही सीन वन्नियार समुदायाची बदनामी करतात. वन्नियार संगमने आक्षेपार्ह सीन हटवण्याची आणि एका आठवड्यात नुकसानभरपाई म्हणून ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. नोटीसमध्ये टीमला समुदायाविरुद्ध खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक टिप्पण्या प्रकाशित करणे ताबडतोब थांबवण्यास सांगितले आहे.” जय भीमला समीक्षक आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. बी.आर.आंबेडकरांच्या विचारसरणीवर हा चित्रपट भाष्य करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा