Friday, July 5, 2024

‘वनराज’च्या सुरात ‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर कश्मीरा शाहने केला जबरदस्त डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय

टीव्ही शो ‘अनुपमा’मध्ये वनराजची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशु पांडे हा अतिशय टॅलेंटेड अभिनेता आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याला गाण्याचीही आवड आहे आणि सुधांशु दररोज आपली कला सादर करत राहतो. अभिनेत्याने पुन्हा एकदा एक मधुर गाणे गायले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. कश्मीरा ‘बिग बॉस १३’व्या आणि १४ व्या सिझनमध्येही दिसली आहे. सध्या ती तिच्या जबरदस्त डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अलीकडेच कश्मीराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ती एका पार्टीदरम्यान पती कृष्णा अभिषेकसोबत ‘गेंदा फूल’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

वनराजचे गाणे
कश्मीराचा हा डान्स व्हिडिओ एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. टीव्ही अभिनेता सुधांशु पांडे ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे गात आहे आणि कश्मीरा या गाण्यावर डान्स करत आहे. हे या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. या व्हिडिओमध्ये तिने ब्राऊन टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केली आहे. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

कश्मीरा शाहच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने तिच्या एका खास गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९९६ मध्ये तिने दोन तेलुगू विशेष गाणी केली. यानंतर, तिने ‘येस बॉस (१९९७)’द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कश्मीरा शाहने निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केले आहे आणि तिने २०१९ मध्ये ‘मरने भी दो यारों’ चित्रपट बनवला. ती ‘बिग बॉस १’मध्ये आली आणि २३ व्या दिवशी घरातून बेदखल झाली. तर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खानची लाडकी लेक आयरा डिप्रेशननंतर करतेय नवीन समस्यांचा सामना; म्हणाली, ‘…तोपर्यंत फक्त रडत राहिले’

-कोट्यवधीच्या गाड्यांमधून फिरणाऱ्या ‘किंग खान’च्या मुलाला मराठी अधिकारी जेव्हा ‘बोलेरो’तून उचलतो

-बॉयफ्रेंड विकी जैनच्या मिठीत दिसली अंकिता, रोमॅंटिक फोटोंचा कोलाज व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा