Tuesday, October 14, 2025
Home मराठी ‘या’ अभिनेत्रीने अभिनयाने मराठीसोबतच गाजवली हिंदी सिनेसृष्टी; जाणून घ्या चित्रपटाचा प्रवास

‘या’ अभिनेत्रीने अभिनयाने मराठीसोबतच गाजवली हिंदी सिनेसृष्टी; जाणून घ्या चित्रपटाचा प्रवास

आपण आजपर्यंत अशा अनेक अभिनेत्री पहिल्या असतील ज्यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील उत्तम करत आपली ओळख मोठी केली. याच यादीतले एक नाव म्हणजे वर्षा उसगांवकर. वर्षा यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने, उत्तम नृत्याने आणि विलोभनीय सौंदर्याने सर्वांच्या मनावर राज्य केले. वर्षा यांनी मराठीसोबतच मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी, कोंकणी, राजस्थानी अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. मराठीमधील सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर ओळखल्या जातात. वर्षा यांनी चित्रपट, नाटकं आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. आज (२८ फेब्रुवारी) वर्षा उसगांवकर त्यांचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

वयाच्या पन्नाशी पार करूनही वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता आली नाही. त्या आजही तितक्याच फिट, सुंदर आणि आकर्षक आहे. मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा या कोंकणी भाषा देखील स्पष्ट बोलतात. त्यांनी १९८४ साली आलेल्या ‘ब्रह्मचारी’ नाटकापासून त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८७ साली ‘गंमत जंमत’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आणि वर्षा यांच्या करिअरची गाडी सुसाट धावू लागली. पुढे त्यांनी ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘हमाल दे धमाल’, ‘अफलातून’, ‘सवत माझी लाडकी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘शेजारी शेजारी’, ‘तिरंगा’, ‘दूध का कर्ज’ आदी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच वर्षा उसगांवकर एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. मात्र त्यांचे हे फोटोशूट त्यांच्या चाहत्यांना अजिबात रुचले नाही, आणि त्यांच्यावर सडकून टीका झाली. पुढे त्यांनी ‘महाभारत’, ‘शोहरत’, ‘घर जमाई’, ‘विष्णू पुराण’, ‘जमाई राजा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ आदी हिंदी, मराठी, राजस्थानी आणि बंगाली मालिकांमध्ये काम केले. वर्षा उसगांवकर या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारत आहे. तब्बल दहा वर्षांनी त्या मालिकेमध्ये काम करताना दिसल्या. ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाच्या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर नाटकात दिसल्या. या नाटकात वर्षा उसगांवकर- प्रशांत दामले ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर दिसली या नाटकाचे प्रोमो सोशल मीडियावर तुफान गाजले, नाटकाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याने लग्नाची मागणी घालताच ‘मृणाल ठाकूर’ चे भन्नाट उत्तर म्हणाली….,’
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस

हे देखील वाचा