चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर दिसतात. यातीलच एक म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं. ९०च्या दशकात चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या वर्षा, आजही चाहत्यांच्या आवडत्या आहेत. त्याकाळी सुंदर अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या वर्षा यांची सुंदरता वयाच्या ५३व्या वर्षीही कायम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या सुंदर अभिनेत्रीचे पतीही तितकेच हॅंडसम आहेत.
वर्षा यांनी सन २००० मध्ये अजय शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. अजय शर्मा हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर यांचे पुत्र आहेत. या जोडप्याने पणजी येथे अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता जवळपास २० वर्षे झाली आहेत. तरीही त्यांच्यातील प्रेम अजूनही कायम आहे. वर्षांचे पती बऱ्याचदा त्यांच्यासोबत अनेक चित्रपट समारंभात दिसतात.
वर्षा यांनी रजनीकांत, जयाप्रदा, विनोद खन्ना यांच्यासारखे कलाकार असलेल्या ‘इंसानियत का देवता’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यासह त्यांनी ‘तिरंगा’, ‘खल-नायिका’, ‘दूध का कर्ज’ या चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती सारख्या बड्या स्टार्ससोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
यासोबतच त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून, प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान बनवले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गंमत जंमत’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘भुताचा भाऊ’, ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘शेजारी शेजारी’, ‘हमाल दे धमाल’ यांचा समावेश आहे.
चित्रपटांसोबत वर्षा उसगावकर टीव्ही मालिकांमध्येही दिसल्या आहेत. १९९० मध्ये त्या दूरदर्शनवरील ‘राणी लक्ष्मीबाई’ मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. तसेच १९९४ साली ‘चंद्रकांता’मध्ये त्या राणी रूपमतीच्या भूमिकेतही दिसल्या होत्या. अखेरच्या वेळेस त्यांना ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत पाहिले गेले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोज्वळ ‘पाठक बाईं’चा साडीतील ग्लॅमरस अंदाज! पाहाच अक्षया देवधरचे भुरळ पाडणारे फोटो
-फोटोत दिसणारी ‘ही’ गोड मुलगी आज आहे बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री, ओळखलं की नाही?
-‘चांद ये हर रोज मैं देखू..! राहुल वैद्य आणि अनुष्का सेनने सोबत गायलं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडिओ