Friday, July 5, 2024

Good News! वरुन धवनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) पुन्हा एकदा काका बनला आहे. वरुण धवनच्या घरी एक चिमुकला पाहुणा आला आहे. होय, वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित धवन (Rohit Dhawan) दुसऱ्यांदा वडील झाला आहे. वरुणची वहिनी जान्हवी धवनने एका मुलाला जन्म दिला आहे. रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलमधून घरी जाताना दिसत आहे. डेव्हिड धवनचा (David Dhawan) मोठा मुलगा रोहित धवन हा चित्रपट निर्माता आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित धवन निळ्या रंगाच्या कॅज्युअल शर्टमध्ये दिसत आहे. तो एकटाच नाही, तर त्याच्यासोबत वडील डेव्हिड धवनही दिसत आहेत. रोहितला पाहताच पॅपराझींनी त्याचे अभिनंदन केले. मुलगा झाल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. रोहित जास्त वेळ तिथे न थांबता गाडीतून लगेचच निघून गेला. (varun dhawan brother rohit dhawan welcome baby boy)

नताशाने केले होते पार्टीचे आयोजन
मार्चमध्ये, वरुण धवनची पत्नी नताशा दलालने वहिनी जान्हवीसाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते. अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुलाही (Anshula Kapoor) या कार्यक्रमात सहभागी झाली होती. अंशुलाने जान्हवीसोबतचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी प्रिंटेड फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे.

 

रोहितने ‘देसी बॉईज’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसले होते. रोहित सध्या ‘शहजादा’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), क्रिती सेनन (Kriti Sanon), परेश रावल आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा