बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता वरुण धवनने चित्रपटसृष्टीत आपले ८ वर्षे पूर्ण केली आहेत. यानंतर त्याने चाहत्यांना धन्यवाद दिला आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द ईयर’मधून केली होती. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते.
धवन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यानिमित्ताने त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपला फोटो टाकत चाहत्यांना धन्यवाद दिला आहे.
धवनने शेअर केलेल्या फोटोत तो स्टेजवर उभा राहून हात जोडताना दिसत आहे. सोबतच मागे चाहत्यांची गर्दीही दिसत आहे. या फोटोसोबत धवनने आपल्या चाहत्यांसाठी लिहिले की, “तुमच्या आणि माझ्यामध्ये सुरू झालेल्या प्रवासाला ८ वर्षे पूर्ण झाले आहेत. जेव्हा कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता, त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल धन्यवाद.”
Today is the day when we have watched him for the first time onscreen and I swear I was in love with him since 1 day on soty promotions Rohan Nanda is very close to my heart he made me introduced to Varun dhawan
A pure soul ❤@Varun_dvn#Varundhawan pic.twitter.com/4CA6XnztOE— Bhoomika (@dhawansgirl) October 19, 2020
वरुण धवनने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मला आठवते की मी प्रत्येक शहरात दौरा केला होता, तेव्हा पत्र, बक्षीसे, टॅट्यू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम मिळालं. मी जेव्हा रडलो, तेव्हा तुम्हीही रडला. मी हसलो, तेव्हा तुम्हीही हसला. परंतु सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मला माहिती आहे की, मी जे काही केले, त्यासाठी मी जबाबदार आहे.”
When I cried u cried when I laughed u laughed but most importantly I know u cared for everything I did and that’s the most important thing. Be safe love Varun. pic.twitter.com/PyIcgGiQsq
— VarunDhawan (@Varun_dvn) October 19, 2020
It’s been 8 years since this journey began between me and u. Thank u for believing in me when no one did. I remember every city I toured. The signs, letters, gifts, tattoos and most Importantly the love. pic.twitter.com/RCHfnFdGzX
— VarunDhawan (@Varun_dvn) October 19, 2020
धवनने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सोबतच ते कमेंटमार्फत प्रतिक्रियाही देत आहेत.
धवनने आतापर्यंत ढिशूम, दिलवाले, स्ट्रीट डान्सर, कलंक, बद्रीनाथ की दुल्हनिया, जुडवा २ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.