बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आता लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अंजिनी ही सिद्धार्थ धवनची मुलगी आहे, तर सिद्धार्थ धवन हा डेविड धवन यांचा भाऊ अनिल धवन यांचा मुलगा आहे. वरुणच्या पुतणीने तिच्या पहिल्या चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, करण जोहर अंजिनी धवनला त्याचे प्रॉडक्शन हाऊस धर्माच्या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये लाँच करणार आहे. तिचा हा पदार्पणातील चित्रपट सुपरहिट होण्यासाठी तिने शास्त्रीय आणि पाश्चात्य नृत्याचे प्रशिक्षण घेणे सुरू केले आहे. (Varun Dhawan’s nephew Anjini Dhawan to make her Bollywood debut with Karan Johar)
अंजिनीला अनेक चित्रपटांच्या ऑफर
माध्यमांतील वृत्तानुसार, धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाव्यतिरिक्त अंजिनीला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. असे असले, तरीही ती सध्या तिच्या पहिल्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. हा चित्रपट २०२२ च्या अखेरीस किंवा २०२३ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.
वरुण धवनच्या चित्रपटात केले काम
वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवनने करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर त्याच्या मार्गावर अंजिनीने ‘कुली नं १’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोविंग
अंजिनी धवन ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. अंजिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे जवळपास १ लाख ६३ हजार फॉलोवर्स आहेत.
अंजिनी धवन आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेकदा एकत्र फोटो शेअर केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा
-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका
-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट