Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड Happy Birthday : पेंटच्या डब्यात दिले जात होते जेवण, वरुण शर्माने सांगितली आयुष्यातील ती घटना

Happy Birthday : पेंटच्या डब्यात दिले जात होते जेवण, वरुण शर्माने सांगितली आयुष्यातील ती घटना

अभिनेता वरुण शर्माने बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाने त्याचे एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे. सहाय्य्क भूमिका तसेच विनोदी व्यक्तिरेखा साकारून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पडद्यावर त्याला बघताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो. अशातच शुक्रवारी (४ फेब्रुवारी) रोजी त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती…

वरुणचा (varun sharma) जन्म ४ फेब्रुवारी १९९० साली पंजाबमध्ये झाला आहे. त्याने त्याच्या अभिनयातील करिअरची सुरुवात ‘फुकरे’ या चित्रपटातून केली. या चित्रपटातील त्याचे ‘चुचा’ हे पात्र सगळ्यांना खूप आवडले होते. त्याचे हे विनोदी पात्र आजही सगळ्यांना आठवणीत आहे. त्याच्या ‘फुकरे ३’ या चित्रपटाची शूटिंग देखील चालू आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याशिवाय ‘छिछोरे’ चित्रपटातील त्याचे सेक्सा हे पात्र देखील अनेकांना खूप आवडले होते. या चित्रपटात त्याने दिवंगत अभिनेता सुशांत राजपूत आणि श्रद्धा कपूरसोबत काम केले होते. त्याचे विनोदी पात्राने सगळ्या प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. वरुणला पंजाब सरकारकडून आयकॉनिक अवॉर्ड देखील मिळाला आहे. (varun sharma birthday special: lets know about his life)

वरुण शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला कशाप्रकारे हिरोच्या मित्राचे पात्र आहे असे सांगून धोका दिला होता. त्याने सांगितले होते की, “मी एक चित्रपट साइन केला होता. मला होते की, मला हिरोच्या मित्राचे पात्र आहे. माझी ऑडिशन देखील झाली होती. एका चार ओळी लिहिलेल्या कागदावर मी सही केली होती. सेटवर गेल्यावर मला समजले की, मला बॅकग्राउंड आर्टिस्टचे काम दिले आहे. मला असे वाटले चला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.”

वरुणने सांगितले की, शूटिंग दरम्यान त्याला पेंटच्या डब्यात जेवण आणून दिले जात होते. त्या डब्यावर त्याचे नाव लिहिले होते. हे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याने त्या चित्रपटाचे नाव नाही सांगितले परंतु ज्युनिअर कलाकारांशी वागण्याची पद्धत त्याला अजिबात आवडली नाही. त्याचे चाहते आता त्याला पुन्हा एकदा विनोदी भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा