Friday, December 1, 2023

‘फुकरे 3’ चित्रपटाचा जलवा कायम ; कमाईचा आकडा ऐकून उंचावतील भुवया, एकदा वाचाच

चार मित्रांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘फुकरे 3‘ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपट गृहात चांगलीच गर्दी केली आहे. वरुण शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी अभिनीत ‘फुकरे 3’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही गाजत आहे. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे 3’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

जवान चित्रपटाच्या झंझावातामध्येही या चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. ‘फुकरे 3’ (Fukrey 3) देशांतर्गत तिकीट खिडकीवर शतक झळकावण्याच्या अगदी जवळ आहे.राष्ट्रीय चित्रपट दिनाचा चित्रपटावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर त्याच्या कमाईत घट झाली. मल्टीस्टारर चित्रपट ‘फुकरे 3’ हा कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय सिनेमा दिन दिवशी 5.10 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती.

17 व्या दिवशी, चित्रपटाने 1.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाची एकूण कमाई आता 87.79 कोटींवर पोहोचली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 115 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट आणि स्टार कास्टशी जोडण्यासाठी काही बीटीएस व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

या व्हिडिओंमध्ये, प्रेक्षकांना पात्रांच्या तयारीबद्दल आणि चित्रपटाच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकते. ‘द व्हॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी 2’ आणि ‘फुकरे 3′ सोबत रिलीज झाले. येत्या आठवड्यात ”फुकरे 3’ ‘ ने 100 कोटींचा टप्पा ओलांडल अशी चर्चा सुरू आहे. ‘फुकरे 3′ हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ”फुकरे’ आणि 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ”फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटांमधील तिसरा भाग आहे. (Varun Sharma Pulkit Samrat Manjot Singh and Pankaj Tripathi starrer Fukrey 3 grosses on day 17)

आधिक वाचा-
सोनालीच्या प्रेमात आकंठ बुडालेला ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू; केलेला किडनॅप करण्याचा प्लॅन
प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर एकत्र ‘या’ चित्रपटात झळकणार, पाहा पहिली झलक

हे देखील वाचा