Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड ‘वेड’ चित्रपटाने रचला नवा विक्रम! टीमसोबत रितेश अन् जिनेलियाने घातला धुमाकूळ

‘वेड’ चित्रपटाने रचला नवा विक्रम! टीमसोबत रितेश अन् जिनेलियाने घातला धुमाकूळ

रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाइ केली आहे. या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं असून चित्रपटातील गाण्यांनी तर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनाही वेड लावलं आहे. रितेशने नवीनच दिग्दर्शन उद्योगामध्ये पदार्पण केलं असून त्याच्या पहिल्याच चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक दिग्दज कालाकरांनी रितेशचे कौतुक केले आहे. तब्बल 20 वर्षानंतर रितेश आणि जिनेलिया देशमुख ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी टित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे.

मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी खऱ्या आयुष्यातही तोवढीच सुंदर आहे जेवढी चित्रपटांमध्ये यांची केमिस्ट्री. वेड चित्रपटामधुन जिनेलियाने तब्बल 20 वर्षानंतर अभिनय क्षेत्रामध्यो पादर्पण केलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्यामुळे रितेशने चित्रपटाच्या टीमने नुकतंच सक्सेस पार्टी केली आहे.

वेड चित्रपाटाने प्रदर्शानाच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायाला सुरुवात केली आहे. पूर्वी एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट सौराटला मानले जायचे. मात्र, वेड चित्रपटाने सैराटचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याशिवाय रितेशचा सर्वाधिक कमाइ करणारा मराठी चित्रपट ‘लय भारी’चा रेकॉर्डदेखिल वेड चित्रपटाने मोडला आहे.

 

View this post on Instagram

 

वेड चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात एकूण 40.85 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या यशामुळे पूर्ण टीमने नुकंतच एक सक्सेस पार्दी केली आहे ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये वेड चित्रपाटची पुर्ण टीम आणि वेड नाव लिहिलेला केक पाहायला मिळत आहे. त्याशिवाय पुर्ण टीमने मला वेड लावलंय या गाण्यावर भन्नाट डान्सही केला आहे. चित्रपट चांगली कामरिगी करत असल्यामुळे सगळ्यांनीच पार्टीचा चांगला आनंद लुटला आहे. त्याशिवाय अनेकांना खात्री आहे की, वेड चित्रपट हा 50 कोटींचा टप्पा पार करेलच.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन पिळगांवकरची लेक न्यारी, साडीच्या साजात दिसते तू भारी
अहो! कुन्या गावाचं आलं पाखरू? बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा