Thursday, July 31, 2025
Home मराठी ‘…इतिहास घडवणाऱ्या चित्रपटाचा’, करण जोहरने लिहिली रितेश देशमुखला खास पोस्ट

‘…इतिहास घडवणाऱ्या चित्रपटाचा’, करण जोहरने लिहिली रितेश देशमुखला खास पोस्ट

मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या एका आणि एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे, आणि तो सिनेमा म्हणजे ‘वेड’. या सिनेमाने मोठा गल्ला कमावला असून अजूनही सिनेमा हिट आणि हाऊसफुल्ल जात आहे. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अनेक मोठमोठ्या मराठी चित्रपटाचे रेकॉर्ड मोडत कमाईचा आणि लोकप्रियेतचा इतिहास रचला आहे. आज या सिनेमाचे सर्वच कलाकार आणि प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. रितेश बहुतकरून हिंदी सिनेसृष्टीमधे जास्त सक्रिय असल्या कारणाने या सिनेमाला अधिक ग्लॅमर प्राप्त झाले. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक नामी कलाकारांनी सिनेमाचे जोरदार प्रमोशन देखील केले.

आज रितेशच्या सिनेमाला मिळालेल्या या यशामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याचे आणि जिनिलियाचे कौतुक करत आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या करण जोहरने रितेश आणि जिनिलियासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे. करणने त्याच्या पोस्टमध्ये वेड सिनेमाची, रितेशच्या दिग्दर्शनाची आणि जिनिलियाच्या अभिनयाची स्तुती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले, “आम्ही दोघं मागील २० वर्ष मित्र आहोत. आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, त्याच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री आहे. त्याच्या आणि माझ्या पहिल्याच भेटीत मी त्याच्याशी जोडला गेलो कारण मला त्याचा चांगुलपणा, मोठे मन आणि त्याचा प्रेमळ स्वभाव आवडला. तो सर्वांना आवडेल असाच सुरुवातीपासून होता. रितेश हा एक उत्कृष्ट अभिनेता असूनही, त्याला कमी लेखले गेले. मी त्याला कायमच मराठी चित्रपटांसाठी खंबीरपणे बोलताना उभे राहताना पाहिले आहे. रितेशला मराठी चित्रपटांबद्दल खूप अभिमान आहे. आज त्याने हे सिद्ध केले की, तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक इतिहास घडवणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. माझे मन अभिमानाने भरून आले आहे. रितेश आणि जिनिलीया यांच्या खऱ्या आयुष्यातही तसेच परिकथेसारखे प्रेम आहे जे चित्रपटात उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहे. लव्ह यू बोथ..”

करणची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर कमेंट्स करत रितेश आणि जिनिलियाचे कौतुक केले आहे. ११ दिवसात या चित्रपटाने ३५ हून अधिक कोटींची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे

 

हे देखील वाचा