Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड आर माधवच्या मुलाला स्विमिंगमध्ये मिळाले तब्बल ७ राष्ट्रीय पुरस्कार, सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव

आर माधवच्या मुलाला स्विमिंगमध्ये मिळाले तब्बल ७ राष्ट्रीय पुरस्कार, सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव

आई- वडिलांची नेहमीच आपल्या मुलांकडून एक माफक इच्छा असते, की आपल्या मुलांनी आपले नाव मोठे करावे, आणि मुलांच्या नावावरून आई- वडील ओळखले जावे. या इच्छेला कलाकार देखील अपवाद नाही. आपण बॉलिवूडमध्ये पहिले तर बहुतकरून कलाकारांचे मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात प्रवेश करतात. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांची मुलं अभिनयात न येत वेगळ्या क्षेत्रात नाव कमावत आहे.

मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध बाप लेकाची जोडी म्हणजे आर माधवन आणि त्याचा मुलगा वेदांत. सर्वांनाच माहित आहे वेदांत हा उत्तम स्वीमर आहे. त्याने आतापर्यंत स्विमिंग स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवले आहे. आता पुन्हा वेदांतने त्याच्या हुशारीने स्विमिंगमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. वेदांतने बंगळुरू येथे संपन्न झालेल्या ४७ व्या ज्युनिअर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने ७ मेडल मिळवले आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे. वेदांताच्या या मोठ्या यशाबद्दल राजकारणापासून ते मनोरंजनक्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर देखील सर्व जणं त्याचे तोंडभरून कौतुक करत आहे. राजकीय नेते अभिषेक संघवी यांनी ट्विट करत लिहिले, “खूप छान वेदांत. आम्हाला तुझ्या पालनपोषणावर गर्व आहे.”

याचवर्षी मार्चमध्ये वेदांतने लाटवियन ओपन स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकत माधवनला अभिमान वाटावा असे आभाळाएवढे यश संपादन केले होते. याबद्दल माधवनने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली होती.

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी माधवनने सोशल इंडियावर एक पोस्ट शेर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “ज्या गोष्टींमध्ये मी चांगला आहे, त्यात मला मागे सापडण्याची खूप धन्यवाद. मला हेवा वाटण्यासोबतच माझे छाती अभिमानाने फुलून गेली आहे. मी तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. १६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की, तू जगातील सर्वात उत्तम व्यक्ती होशील. मी एक नशीबवान पिता आहे.”

काही दिवसांपूर्वी आर्यन खानला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर वेदांत आणि आर्यनची जबरदस्त तुलना सुरु होती. दोघेही ग्लॅमर जगातून येत असले तरी त्यांच्या संस्कारांमध्ये किती फरक आहे हेच सर्व बोलत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ

-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर

-‘जोपर्यंत हे मला लहान मुलासोबत बघणार नाही…’ प्रेग्नंसीच्या अफवांवर बिपाशा बासूचे नेटकऱ्यांना सणसणीत उत्तर

हे देखील वाचा