Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड खुशी कपूरसोबत ब्रेकअपनंतर वेदांग रैना निळ्या डोळ्यांच्या हसीनासोबत स्पॉट, तर ती आहे एका सुपरस्टारची नात

खुशी कपूरसोबत ब्रेकअपनंतर वेदांग रैना निळ्या डोळ्यांच्या हसीनासोबत स्पॉट, तर ती आहे एका सुपरस्टारची नात

वेदांग रैना सध्या आपल्या कामाइतकाच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच त्याचा खुशी कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता वेदांग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तो एका नव्या अभिनेत्रींसोबत स्पॉट झाला असून, यामुळे नव्या लव्ह स्टोरीपेक्षा बॉलिवूडच्या सिल्व्हर स्क्रीनवर येऊ घातलेल्या एका फ्रेश जोडीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

वेदांग रैना आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असलेली नायोमिका सरन यांना नुकतेच मुंबईतील मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर एकत्र पाहण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, वेदांग आणि नायोमिकाला घेऊन विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. हातात स्क्रिप्ट आणि चेहऱ्यावर नव्या प्रोजेक्टची उत्सुकता असलेली ही जोडी सध्या बॉलिवूडच्या गलियार्‍यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांग आणि नायोमिका मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या स्क्रिप्ट रीडिंग सेशनसाठी गेले होते. निर्माता दिनेश विजान यांच्या ऑफिसमधून दोघे बाहेर पडताच पॅपराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. नायोमिका लगेचच आपल्या कारमधून निघून गेली, तर वेदांग काही वेळ तिथेच थांबले. यानंतर हा प्रोजेक्ट अंतिम प्री-प्रोडक्शन टप्प्यात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारी एक अनटायटल्ड रोमँटिक कॉमेडी असणार आहे. ‘स्त्री’, ‘लुका छुपी’ आणि ‘मिमी’सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅडॉक फिल्म्सची ही नवी फिल्म Gen-Z प्रेक्षकांना लक्षात घेऊन तयार केली जाणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2026 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटातून नायोमिका सरन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नायोमिका ही अभिनेत्री रिंकी खन्ना (Rinke Khanna)यांची मुलगी असून, दिग्गज अभिनेता राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नायोमिका गेल्या एक वर्षापासून अभिनय आणि नृत्याचे प्रोफेशनल ट्रेनिंग घेत आहे. ती पूर्णपणे तयार झाल्याशिवाय तिच्या डेब्यूची घोषणा न करण्यावर दिनेश विजान आणि त्यांच्या टीमचा ठाम निर्णय होता.

वेदांग रैनाने ‘द आर्चीज’ (2023) या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. त्यानंतर आलिया भट्टसोबत ‘जिगरा’ (2024) मधील त्याच्या दमदार अभिनयामुळे तो चर्चेत आला. आता त्याच्याकडे एक उभरता लीडिंग मॅन म्हणून पाहिले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हा रोल आधी अगस्त्य नंदाला ऑफर करण्यात आला होता, मात्र डेट्सच्या अडचणीमुळे वेदांगची निवड करण्यात आली. स्क्रीन टेस्टदरम्यान वेदांग आणि नायोमिका यांची केमिस्ट्री नैसर्गिक वाटल्याने दोघांनाही फायनल करण्यात आले. सध्या वेदांग इम्तियाज अली यांच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, ते पूर्ण होताच तो या रोमँटिक कॉमेडीवर काम सुरू करणार आहे.

दरम्यान, वेदांग आणि खुशी कपूर यांच्या नात्याबाबतही चर्चा सुरूच आहेत. कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी, जवळपास दोन वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवा आहेत. 2025 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केलेला ख्रिसमस आणि 2026 च्या सुरुवातीला सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट्समध्ये दिसलेली अनुपस्थिती या चर्चांना आणखी बळ देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

फक्त 65 एपिसोडमध्ये इतिहास घडवणारा हा कॉमेडी शो, आजही प्रेक्षकांचा फेव्हरेट; तर IMDb 8.7 रेटिंग

हे देखील वाचा