Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ए बोट दाखवू नकोस’, कॅप्टन्सी टास्कदरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात विकास अन् जयमध्ये झाली हाणामारी

‘बिग बॉस’ मराठीचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये सर्वच स्पर्धक जिंकण्यासाठी मोठ्या जिद्दीने टास्क पूर्ण करत आहेत. अशात शिवलीला या घरामधून बाहेर पडली. नुकताच हल्ला बोल हा टास्क स्पर्धकांनी पूर्ण केला.

आज म्हणजे १ ऑक्टोबरला टीव्हीवर दिसणाऱ्या भागामध्ये विकास पाटील आणि जय दुधानेमध्ये जंगी भांडण होताना पहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आता ‘खुल जा सिम सिम’ हा निविन टास्क खेळला जाणार आहे. या भागाचा प्रोमो व्हिडिओ कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विकास पाटील सुरुवातीला ‘खुल जा सिम सिम’ टास्क विषयी माहिती देतो. त्यानंतर जय आणि विकासमध्ये मारामारी होते. दोघेही एकमेकांना चांगलेच भिडतात. (Verbal fight between big boss contenders for Captaincy)

या व्हिडिओमध्ये विकास टास्क विषयी सांगताना म्हणतो की, “हे कॅप्टन तुम्हाला चालणार आहेत का?” यावर अक्षय वाघमारे म्हणतो की, “खुन्नस काढायची असेल तर नाही होणार कॅप्टन.” त्यानंतर जय विकासला बोट दाखवत म्हणतो, “ये इकडे हॅलो, आता बघ तू संचालक कसा खेळतो ते बघ.” त्यानंतर पुन्हा विकास रागात म्हणतो, “बोट दाखवू नको.” या सर्वांमध्ये विकास आणि जयमध्ये चांगलीच जुंपलेली दिसत आहे. घरातील सर्व सदस्य या दोघांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे दोघेही कुणाचेच ऐकत नाही.

हा प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना पुढे नेमकं काय झालं हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे. अशात सर्व रसिक प्रेक्षकांना पुढील भाग रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी या चॅनलवर पाहता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा