Wednesday, June 26, 2024

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी मनोरंजनविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे वयाच्या 69 वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. अजित यांनी मराठी नाटकांमध्ये जास्त काम केले. चालते बोलते ‘नाट्यविद्यापीठ’. प्रायोगिक नाटकाचे हे ‘शेवटचे भीष्माचार्य’ आपल्यातून आज गेले आहेत.

अजित भगत आर्य चाणक्य, जांभूळ आख्यान, सगेसोयरे, रोमन साम्राज्याची पडझड, मुंबईचे कावळे, जय जय रघुवीर समर्थ, झाला अनंत हनुमान, अरण्य-किरण आदी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. याशिवाय प्रायोगिक रंगभूमीवर तुफान गाजलेली अनेक नाटके अजित भगत यांनी दिग्दर्शित केली होती. अजित भगत म्हणजे ऍब्सर्ड आणि ऍब्स्ट्रॅक्ट शैलीचा वापर ते नेहमीच करायचे.

दिग्दर्शनासोबतच अजित यांनी अभिनय देखील केला. त्यांनी ‘मॅड मॅड मर्डर’, ‘एक वाडा झपाटलेला’ आदी अनेक मालिकांमध्ये काम केले. अजित भगत यांनी पंडित सत्यदेव दुबेजीच्या ‘इसापचा गॉगल’ या नाटकात देखील काम केले. विशेष म्हणजे अजित यांच्या त्या नाटकातील अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले होते.

यासोबतच अजित भेट हे ‘कंपनी’ , ‘मुंबई मेरी जान’ अशा हिंदी चित्रपटांमधेही झळकले. त्यांना अनेक लहानमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. अजित भगत यांनी नेहमीच त्यांच्या कलाकृतींमध्ये विविध प्रयोग केले. एक उत्तम आणि प्रतिभावान दिग्दर्शक आणि अभिनेता गमावल्याचे दुःख अनेकांनी व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने

‘घर बंदूक बिरयानी’मध्ये कलाकरांची पाहायला मिळणार वेगवेगळी शैली; त्यामुळे ही बिर्याणी होणार अधिकच चविष्ट

हे देखील वाचा