Wednesday, July 3, 2024

सिंदूर नसल्यामुळे शम्मी कपूर यांनी थेट भरली होती गीता बालींच्या भांगेत लिपस्टिक; खूपच रंजक आहे कहाणी

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. आपल्या हटके अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप सोडणाऱ्या शम्मी यांनी 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 ऑगस्ट, 2011रोजी या जगाचा निरोप घेतला होता. ते जेव्हा रुपेरी पडद्यावर यायचे, तेव्हा त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयासह नाचण्यास भाग पाडले. ‘जंगली’ चित्रपटात ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ या गाण्यात त्यांना उडी मारताना आणि ‘याहू’ म्हणताना पाहण्यात अजून मजा येते. कपूर कुटुंबातील सर्व कलाकारांची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत.

शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1960ला झाला होता. शम्मी कपूर (Shammi Kapoor) हे त्यांच्या अनोख्या नृत्यशैलीसाठी खूप प्रसिद्ध होते. शम्मी यांना चित्रपटसृष्टीत हळूहळू यश मिळाले, पण जेव्हा त्यांना यश मिळाले, तेव्हा ते एक सुपरस्टार बनले. शम्मी कपूर यांच्या चित्रपटांप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही कमी रोमांचक नव्हते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

गीता बालीवर प्रेम
सुपरस्टार अभिनेते शम्मी कपूर यांनी गीता बालीसोबत चित्रपट केला होता, तेव्हा ते गीता यांच्या प्रेमात पडले होते. ‘रंगीन रातें’ चित्रपटाच्या आऊटडोअर शूटिंग दरम्यान प्रेमाचे अंकुर फुटले होते. असे म्हटले जात होते की, जेव्हा शम्मी कपूर यांनी गीता यांना लग्नाची मागणी घातली होती, तेव्हा गीता यांनी त्यांना नकार दिला होता. पण एके दिवशी गीता यांना काय वाटले काही माहिती नाही. त्यांनी सरळ शम्मी कपूर यांना सांगितले की, त्यांना आजच लग्न करायचे आहे. शम्मी कपूर यांच्या यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो.

भांगेत भरली लिपस्टिक
गीता यांच्या या अचानक निर्णयाने शम्मी कपूर यांना आश्चर्य वाटले. तरीही त्यांनी हे कसे शक्य आहे, असे विचारले. यानंतर गीता यांनी त्यांना सांगितले की, आता नाही तर कधीच नाही. शम्मी अशी संधी कशी काय गमावू शकतात? दोघेही मंदिरात पोहोचले आणि परिस्थिती अशी आली की, ज्या शम्मी कपूर यांच्या लग्नात सिंदूर नव्हते. अशा परिस्थितीत गीता बाली यांची लिपस्टिकच कामाला आली आणि शम्मी यांनी त्यांच्या भांगेत लिपस्टिक भरली.

गीता बाली यांच्या निधनाने शम्मी कपूर खचले
शम्मी कपूर आणि गीता बाली यांचे वैवाहिक आयुष्य प्रेमाने भरलेले होते. ते दोन मुलांचे पालक होते. मात्र, लग्नाला फक्त 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आजारपणामुळे गीता यांनी 1965 जगाचा निरोप घेतला आणि शम्मी कपूर एकटे पडले. शम्मी गीता यांच्या मृत्यूनंतर किती खचले होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नंतर त्यांची अवस्था पाहून कुटुंबीयांनी शम्मी कपूर यांचे नीला देवीसोबत लग्न लावून दिले होते.

नीला यांच्यापुढे ठेवली होती ‘ही’ अट
मात्र, लग्नापूर्वी त्यांनी नीलापुढे अट ठेवली होती. त्यांनी म्हटले होते की, ते लग्नानंतर मूल जन्माला घालणार नाहीत. तसेच दोन्ही मुलांचे आई म्हणून पालन करावे लागेल. नीला यांनीही शम्मी यांची ही गोष्ट मान्य केली. लग्नानंतर नीला यांनीही केवळ शम्मी यांचीच नाही, तर मुलांचीही काळजी घेतली.

शम्मी कपूर यांच्या जन्माची कहाणी
शम्मी कपूर यांच्या जन्माची कहाणी काही कमी कठीण नव्हती. पृथ्वीराज कपूर यांचा शम्मी हे एकमेव असे मूल होते, ज्यांचा जन्म रुग्णालयात झाला होता. त्या काळात, दाईच्या मदतीने घरी मुले जन्माला यायची. शम्मीच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आई आजारी होत्या, ज्यामुळे त्यांचा जन्म रुग्णालयात झाला होता. त्यांच्या जन्मानंतरही त्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती.

शम्मी कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत ‘जंगली’ आणि ‘तीसरी मंजिल’ सारखे अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. त्यानंतर 2011 मध्येच रणबीर कपूर सोबत ‘रॉक स्टार’ या चित्रपटात दिसले होते. (Veteran actor Shammi Kapoor had an affair with his first wife Geeta Bali, who had refused to marry him)

अधिक वाचा- 
उर्फी जावेद नवरात्री स्पेशल लूकमध्ये, अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले…
‘दृष्यम’ फेम अभिनेत्रीच्या हटके गाऊनची सोशल मीडियावर हवा

हे देखील वाचा