Saturday, June 29, 2024

‘द कपिल शर्मा शो’मध्ये धरम पाजींनी उलगडले आपल्या फिटनेसचे रहस्य; जाणून तुम्हीही व्हाल दंग

कॉमेडी किंग कपिल शर्मा हा ‘द कपिल शर्मा शो’ च्या तिसऱ्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी त्याच्या शोमध्ये एक नवीन अंदाज पाहायला मिळत आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या वीकेंडला कपिलच्या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा येणार आहेत. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हे दिग्गज अभिनेते त्यांची मैत्री साजरी करण्यासाठी येणार आहेत. धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा या शोमध्ये कपिलशी खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा करताना दिसणार आहेत. यासोबतच काही जुन्या आठवणींना उजाळा देतील.

कपिल शर्मा धर्मेंद्र यांचे काही जुने फोटो एका सेगमेंटमध्ये दाखवणार आहे. ज्यात त्यांची टोन्ड बॉडी स्पष्ट दिसत आहे. कपिलच्या शोची परीक्षक अर्चना पूरन सिंगने धर्मेंद्र यांना प्रश्न विचारला की, “आजचे कलाकार असे शरीर मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेतात. तुम्हाला हा बॉडी टाईप मिळण्यामागचे रहस्य काय होते?”

धर्मेंद्र यांनी सांगितला फिटनेस मंत्र
अर्चना पूरन सिंगच्या प्रश्नानंतर धर्मेंद्र यांनी शोमध्ये आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले. ते म्हणाले की, “जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आमच्याकडे हातपंप नव्हता, म्हणून आम्ही विहिरीतून बादलीत पाणी आणायचो. मी भरपूर बादल्या भरून पाणी आणायचो. मी सुद्धा कबड्डी खूप खेळायचो आणि माझ्या मांड्या खूप मजबूत आहेत, कारण मी रोज २५ किलोमीटर सायकल चालवत होतो. ज्याने मला ‘धरमवीर’ या चित्रपटात खूप मदत केली.” (Veteran actors Dharmendra and Shatrughan Sinha from ‘The Kapil Sharma Show’ will visit the audience)

धर्मेंद्र यांच्या फिटनेसबद्दल ऐकून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “धर्मेंद्र साहेबांइतका तंदुरुस्त कोणीच नाही. लोकांनी त्यांचा आदर केला, कारण त्यांनीच बेअर बॉडी शॉट्स सुरू केले होते.”

धर्मेंद्र हे जीवन जगण्यासाठी स्वतःला धन्यवाद देत आहेत, कारण त्यांना जीवन जगताना खूप चांगले- वाईट अनुभव आले आहेत आणि त्यातूनच त्यांनी खूप काही शिकले आहे. ते म्हणाले की, “लहान शहर आणि मध्यमवर्गीय कुटुंब असूनही मी या व्यवसायात आल्यानंतर आयुष्य जगलो आहे. अनेक निर्मात्यांनी मला नाकारले. त्या दिवसात मी विश्वास दृढ ठेवला. त्याचा परिणाम म्हणजे मी आज इथे आहे.”

धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांसोबतचा हा एपिसोड मजेदार असणार आहे. जिथे कपिल शर्माची संपूर्ण टीम दोन्ही दिग्गज कलाकारांसोबत खूप मजा करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा