Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड दु:खद! सलमान खान आणि ऐश्वर्या सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

दु:खद! सलमान खान आणि ऐश्वर्या सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले. भैरवी वैद्य शेवटची टीव्ही शो ‘निमा डेन्झोंगपा’मध्ये दिसल्या होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. गेल्या 45 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भैरवी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. भैरवी वैद्य गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते प्रतीक गांधी आणि बाबुल भावसार यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

प्रतीक गांधी म्हणाले, “मला भैरवी वैद्यबरोबर (Bhairavi Vaidya) ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमचे चांगले बॉन्डिंग होते. त्या खूप प्रेमळ होत्या. मी त्यांना लहानपणी स्टेज आणि टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.”

बाबुल भावसार म्हणाले, “खूप वर्षांपूर्वी मी त्यांच्याबरोबर एक नाटक केलं होतं. त्या स्वभावाने खूपच चांगल्या होत्या आणि त्या व्यक्तिरेखाही उत्तम साकारायचा. त्या खऱ्या आयुष्यात भांडल्या तरी आपल्याला वाटायचं की या किती गोड बोलतात. त्या स्वतःचं काम करून निघून जायच्या.” भैरवी वैद्य यांनी अनेक टीव्ही शो आणि नाटकांमध्ये काम केले होते. ती गुजराती चित्रपटांचाही एक भाग होती. भैरवी वैद्यने ऐश्वर्या रायसोबत ‘ताल’ सिनेमात आणि सलमान खानसोबत ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमात काम केलं होतं. त्यांच्या निधनाने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

भैरवी वैद्य यांनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘ताल’, ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘हसरतीन’, ‘महिसागर’, ‘निमा डेन्झोंगपा’ यासह अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केले आहे. भैरवी वैद्य यांच्या निधनाने हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. (Veteran actress Bhairavi Vaidya who worked with actors like Salman Khan and Aishwarya passed away)

आधिक वाचा-
रिया कपूरने ‘वीरे दी वेडिंग २’ चित्रपटाच्या सिक्वेलवर केला मोठा खुलासा, करीना-सोनम पुन्हा स्क्रिन शेअर करणार?
कॉलेजमध्ये असतानाच झाली होती दोघांची पहिली भेट, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा