तब्बल ३५ सुपरहिट; दिग्दर्शकाबरोबर लग्न अन् लाखो चाहते, तरीही ‘या’ अभिनेत्रीच्या अंत्यविधीला आले नव्हते इंड्रस्टीतील लोक


आज बोलूयात पूर्वीच्या काळातील अशा अभिनेत्रीबद्दल, ज्यांच्या सौंदर्यावर एकेकाळी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये चर्चा असायची. त्या काळी अभिनेत्री ज्या काही स्टाईल करायच्या, त्या वर्तमानपत्र, टीव्ही किंवा सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळायच्या. त्यांच्या स्टाईलची कॉपी करण्यासाठी चाहते पेपराची कात्रण जपून ठेवत असे. तेव्हा कलाकारांना भेटणं किंवा फोटो घेणं, आजच्या एवढं सोप्पं नव्हतं. याच काळात अर्थात 60 आणि 70 च्या दशकात ‘साधना कट’ नावाची हेअरस्टाईलही महिलांमध्ये खूप लोकप्रिय होती. ही स्टाईल कुणावरुन आली होती, तर ती 1941 मध्ये कराची (पाकिस्तान) येथे जन्मलेल्या अभिनेत्री साधनामुळे.

साधना त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. साधनाचा पहिला चित्रपट 1960 चा ‘लव्ह इन शिमला’ हा होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आर.के. नय्यर यांनी केले होते. त्याचवेळी या चित्रपटामध्ये साधना यांच्या विरुद्ध जॉय मुखर्जी यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

अशातच त्यांना राजकपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून कास्ट केलं गेलं. या चित्रपटातील इचक दाना गाण्यामध्ये आपल्याला बालस्वरूपातील साधनाजी पाहायला मिळतात.

साधनाजी या सिंधी भाषिक असल्याने त्या सिद्धी भाषेमध्ये अभिनयाचे स्टेज शोज करत असत. अशातच एका सिंधी चित्रपटांच्या दिग्दर्शकाने त्यांना पाहिलं आणि फिल्म अबानामध्ये कास्ट केलं. गंमत म्हणजे या सिनेमासाठी त्यांना फक्त १ रुपये इतकीच टोकन अमाउंट दिली गेली होती. यानंतर मात्र साधना यांच्या बॉलिवूड प्रवेशाची एक वेगळीच कथा आहे.

खरं तर त्यावेळी चित्रपटनिर्माते सशाधर मुखर्जी हे त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी याला बॉलिवूडमध्ये लाँच करायचा प्लॅन करत होते. परंतू, जॉयसोबत मुख्य भूमिकेसाठी त्यांचा अभिनेत्रीसाठी शोध सुरू होता. अशातच एक मॅगझीनमध्ये त्यांनी साधना यांचा अबाना चित्रपटातील एक फोटो पाहिला आणि ते स्तब्धच झाले.

त्यांना चित्रपटाची नायिका मिळाली होती. लगेचच सशाधर यांनी साधना यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना चित्रपट लव्ह इन शिमलामध्ये कास्ट केलं. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर इतका तुफान चालला की साधना या रातोरात स्टार झाल्या होत्या.

हा फक्त साधनाच नव्हे तर त्यांची या चित्रपटातील हेअर कट देखील तुफान प्रसिद्ध झाली होती. आजच्याच भाषेत म्हणायचं झालं तर व्हायरल झाली होती. गंमत म्हणजे अजूनही त्या तीच हेअर स्टाईल करत होत्या. परंतु आपल्याला ठाऊक आहे का की त्यांची ही हेअर स्टाईल ठरवण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले होते. अनेक प्रयत्नांनंतर ही हेअर स्टाईल अंतिम ठरवण्यात आले होती.

मेरा साया, राजकुमार, मेरे मेहबूब, वो कौन थी, वक्त, असली – नकली, एक फुल दो माली, आप आये बहार आयी अशा एक ना अनेक उत्तमोत्तम सिनेमांमधून साधनाजी सतत रुपेरी पडद्यावर झळकत राहिल्या. सततच्या कामामुळे त्या आजारी पडू लागल्या. त्यांना थायरॉईडची लागण झाली. ज्याच्या उपचारासाठी त्या अमेरिकेला गेल्या आणि बऱ्या होऊन आल्या. यानंतर इंतकाम आणि एक फुल दो माली हे दोन हिट चित्रपट दिले आणि यशस्वी पुनरागमन केलं.

त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३५ सिनेमे केले ज्यातील बहुतांश सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

चित्रपटासह साधना आणि आर के नय्यर यांच्या प्रेमकथेलाही वेग आला होता. सन १९६६ मध्ये साधनाजींनी त्यावेळचे प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आर. के. नय्यर यांच्याशी विवाह केला होता, त्यानंतर पुढे 30 वर्ष सर्वकाही व्यवस्थित चालू राहिले. तथापि, काळ बदलला आणि आर के नय्यर साहेबांच्या निधनानंतर साधना पूर्णपणे एकटी पडली.

साधना आणि नय्यर साहेबांना मुलं नव्हती. ज्या ठिकाणी साधना राहत होती त्या घरावरही खटला चालविला जात होता. अशा परिस्थितीत, आजारपणात त्यांना सतत पोलिस ठाणे व कोर्टात जावे लागत होते. इतकी चांगली सुरुवात झालेल्या अभिनेत्रीची शेवटची वेळ अशी असेल असा विचारही कोणी केला नव्हता. अखेर 25 डिसेंबर 2015 रोजी साधना हे जग सोडून कायमच्या निघून गेल्या. आश्चर्य म्हणजे साधनाला निरोप देण्यासाठी काही मूठभर लोकच इंडस्ट्रीमधून आले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.