Friday, November 22, 2024
Home अन्य सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आजाराने ग्रासले, अभिनेता मुलाने दिली माहिती

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आजाराने ग्रासले, अभिनेता मुलाने दिली माहिती

अनेक गाजेजल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव अल्झायमर ग्रस्त आहेत. ही बातमी त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव याने नुकतीच आपल्या ट्विटर द्वारे दिली.

“माझी आई श्रीमती सीमा देव मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत आणि आदरणीय व्यक्तिमत्व, ती सध्या अल्झायमरने ग्रस्त आहे, आम्ही संपूर्ण देव परिवार तिच्या लवकर बऱ्या होण्या करिता प्रार्थना करीत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील हे आवाहन करतो की ज्यांना तुम्ही इतकं प्रेम दिलंय त्यांच्यासाठी जरूर प्रार्थना करा.”

ट्वीट पोस्ट करताच, सीमा ताईंना शुभेच्छा देणाऱ्या संदेशांचा पाऊस पडला. यावरून त्याच्यावरील प्रेम आणि आदराचा आपल्याला नक्कीच अंदाज येऊ शकतो. अजिंक्यने सर्वांना शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानत ट्विट केले, “संपूर्ण देव परिवाराच्या वतीने तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”

पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत ७८ वर्षीय सीमा ताईंनी ‘जगाच्या पाठिवर’, ‘वरदक्षिणा’ यासारख्या नामांकित मराठी चित्रपटात काम केले आहे. सोबतच १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कोशिश’  ‘ड्रीमगर्ल’   या सारख्या चित्रपटांमधून देखील त्या आपल्याला दिसल्या.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा