Friday, July 5, 2024

बिग ब्रेकिंग l जेष्ठ बंगाली अभिनेत्याचे दुःखद निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोमवार ( 29 ऑगस्ट) संध्याकाळी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप मुखर्जी यांचे निधन झाले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रुग्णालयात सोमवारी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. प्रदीपने वयाच्या ७६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सत्यजित रे यांच्या ‘जन अरण्य’ मधील भूमिकेमुळे हा अभिनेता प्रसिद्ध झाला.

याशिवाय त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ या चित्रपटात डॉ. मैतीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रदीपने बरीच प्रशंसाही मिळवली होती. प्रदीप मुखर्जी यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे 22 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे रविवारपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

गेल्या दोन वर्षांत त्यांना दोनदा कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1946 रोजी झाला. कोलकात्याच्या सिटी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना अभिनयाचे आकर्षण होते. अनेक थिएटर अकादमींशीही त्यांचा सक्रिय सहभाग होता. रंगमंचावरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रदीपला सत्यजित रेचा अभिनय पाहिल्यानंतर त्याच्या ‘जन अरण्य’ या आयकॉनिक चित्रपटात सोमनाथची भूमिका देण्यात आली.

हेही वाचा – छोटे कपडे घातल्यामुळे अभिनेत्री सारा अली खान झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘बाई तुझी पॅंन्ट…’

रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक

यामुळे टायगर श्रॉफला येतो रणवीर सिंगचा प्रचंड राग; म्हणाला, ‘त्याची बायको…’

हे देखील वाचा