Saturday, June 29, 2024

सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, तुटलेल्या हृदयासोबत अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट

गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिग्गज दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार सावन कुमार टाक यांचे निधन झाले आहे. ते मागील काही दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल होते. सावन यांच्या निधनानंतर कलाविश्व दु:खात आहे. त्यांच्या निधनावर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण दु:ख व्यक्त करत आहेत. अशात सावन यांच्यासोबत काम करणारा सुपरस्टार सलमान खान हादेखील त्यांच्या निधनावर भावूक झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

दिग्गज चित्रपट निर्माते होते सावन कुमार
सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांनी अनेक गाण्यांचे बोल लिहिले होते. तसेच, त्यांनी अनेक सिनेमांचे दिग्दर्शनही केले होते. ते मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल होते. त्यांना फुफ्फुसांचा त्रास होता. त्यांचे फुफ्फुस निकामी झाल्याने आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे, त्यांचा भाचा आणि दिग्दर्शक नवीन टाक याने सांगितले.

त्यांचा भाचा नवीन याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सावन कुमार यांना जवळपास ४.१५ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांचे फुफ्फुस निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. सावन यांचे वय ८६ वर्षे होते.”

सलमान खान याने शेअर केली भावूक पोस्ट
अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सावन कुमार टाक यांचा जवळचा मित्र होता. त्यांच्या निधनामुळे तो खूपच दु:खी झाला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सावन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सावन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “प्रिय सावन जी, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. माझ्या मनात तुमच्यासाठी नेहमीच आदर राहिला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सावन यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १९६७मध्ये ‘नौनिहाल’ या सिनेमातून निर्माता म्हणून सुरुवात केली होती. पुढे त्यांनी १९७२मध्ये ‘गोमती के किनारे’ या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. हा अभिनेत्री मीना कुमारीचा शेवटचा सिनेमा होता. सावन यांनी ‘कहो ना प्यार है’, ‘सनम बेवफा’ आणि ‘सौतन’ यांसारख्या सिनेमांसाठी गाणीही लिहिली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल
बॉलिवूडवर शोककळा! हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, हार्ट अटॅकने घेतला जीव
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

हे देखील वाचा