Thursday, March 28, 2024

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचं निधन; १० दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये केलं होतं ऍडमिट

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजेश यांचं शनिवारी (१९ फेब्रुवारी) निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांना १० दिवसांपूर्वीच म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बंगळुरूच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शनिवारी पहाटे २.३० वाजता त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या मागे पाच मुले आहेत.

त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककला पसरली आहे. अनेक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त होते राजेश
राजेश हे ८९ वर्षांचे होते. किडनी खराब झाल्याने आणि वाढत्या वयाशी संबंधित आजाराने राजेश यांच्यावर बंगळुरूच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ते बरे होऊ शकले नाहीत.

कमी वयात जोडले होते थिएटरसोबत
अभिनेते राजेश यांचा जन्म १५ एप्रिल, १९३२ रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्यांचं खरं नाव मुनी चौडप्पा होतं. त्यांनी आपल्या आई- वडिलांच्या विरोधात जाऊन कमी वयातच थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांचं स्टेज नाव विद्यासागर होतं. राजेश यांनी आपला स्वत:चा थिएटर ग्रूप तयार केला, ज्याचं नाव शक्ति ड्रामा बोर्ड होतं.

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

राजेश यांनी १५० हून अधिक सिनेमात केलं काम
त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक सिनेमात काम केलं आहे. राजेश त्यागराजा भागवतार, राजकुमारी, टीआर महालिंगम आणि बरेच काही यांसारख्या कलाकारांना पाहतच मोठे झाले होते. तेव्हाच त्यांनी सिनेसृष्टीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. रंगभूमीची आवड पाहून ते सुदर्शन नाटक मंडळीत सामील झाले. ‘विष सरपा’, ‘नंदा दीपा’, ‘चंद्रोदय’ आणि ‘कित्तूर राणी चेन्नम्मा’ ही त्यांची काही लोकप्रिय नाटके होती. राजेशने गायन क्षेत्रातही हात आजमावला. १९६३ मधला ‘श्री रामांजनेय युद्ध’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा