सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. मीना देशमुख या 60 वर्षांच्या होत्या. रविवारी (दि. 27 नाेव्हेंबर)ला पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्याजवळील अरुंद पुलावरून त्यांचे चारचाकी वाहन 50 फूट खोल कालव्यात कोसळले. त्यात लावणी कलावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर सद्स्य गंभीररित्या जखमी झाले.
माध्यमातील वृतानुसार, मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत असताना रविवारी (दि. 27 नाेव्हेंबर)ला रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून जात असलेल्या चार चाकी वाहनाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट 50 फूट खोल कालव्यात जाऊन कोसळली. या अपघातात मीना देशमुख (meena deshmukh) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांची लेक, नात व वाहन चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्याला सुरुवात केली. मात्र, चारचाकी वाहण ज्या कालव्यात काेसळले हाेते, त्या कालव्यात उतरायला नागरिकांना जागा नसल्यानं बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे मदतकार्याने दोरीच्या सहाय्यानं मीना देशमुख आणि त्यांच्या कुंटुबातील सदस्याना बाहेर काढून, तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, या अपघातादरम्यान मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रीच्या वेळी पुलावरुन गाडी जात असताना वाहण चालकाचे नियंत्रन सुटले आणि गाडी या खाेल कालव्यात पडली. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम थांबलेले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात हाेतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघात हाेऊन बळीं जाण्याची वाट पाहणार आहेत असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. (veteran lavani artist meena deshmukh passed away)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परी म्हणू की सुंदरा! लाल रंगाच्या साडीत खुललं काजोलचं सौंदर्य
मृणालच्या ग्लॅमरस लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका










