दुःखद.! दिग्गज मराठी अभिनेत्री माधवी गोगटे काळाच्या पडद्याआड, ५८ व्या घेतला अखेरचा श्वास


ज्येष्ठ मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्या ५८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधवी गोगटे यांच्या पश्चात त्यांचे पती आणि विवाहीत मुलगी असा परिवार आहे.

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला होता. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर, १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती.

अभिनेत्री माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते.

अनेक नाटके, मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून गोगटे यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. भ्रमाचा भोपळा, गेला माधव कुणीकडे ही त्यांची नाटके विशेष गाजली होती.


Latest Post

error: Content is protected !!