Saturday, November 8, 2025
Home साऊथ सिनेमा दुःखद! मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध पटकथा लेखकाचे दुःखद निधन

दुःखद! मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध पटकथा लेखकाचे दुःखद निधन

प्रसिद्ध पटकथा दाक्षिणात्य लेखक श्री रमण यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांनी त्यांच्या लेखणीतून भारतीय सिनेसृष्टीला अनेक उत्तम सिनेमे देत आपली मोठी छाप सोडली. श्री रमण यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. रमण यांनी तेलगू सिनेमा आणि साहित्यामध्ये आपले मोठे आणि उल्लेखनीय योगदान दिले.

मीडियामधील रिपोर्ट्सनुसार रमण १९ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. मागील बऱ्याच काळापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये ‘मिथुनम’ सिनेमाच्या पटकथेचा आवर्जून उल्लेख केला जातो. गायक-अभिनेता एसपी बालासुब्रमण्यम आणि लक्ष्मी अभिनीत हा रोमँटिक ड्रामा सिनेमा रमण यांच्या कादंबरीवर आधारित होता. या सिनेमाला नंदी पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.

आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात रमण यांचा जन्म झाला होता. साप्ताहिकांमध्ये लेख लिहिल्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. त्यांनी त्यांच्या जीवनात अक्षरा थुनीरम उपनाम घेत अनेक व्यंगात्मक रचना केल्या. ‘जोकी ज्योति’, ‘श्री चैनेल’, ‘पंडारी’, ‘मोगली रेकुलु’ आदी गाजलेल्या कादंबरी आहेत.

हे देखील वाचा