संगीत क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठमोळ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. गुरुवारी (२५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. आशा यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जाते. त्यांनी सन १९४३ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.
आशा यांचा जन्म ८ सप्टेंबर, १९३३ साली सांगली जिल्ह्यात झाला होता. त्यांनी आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. यामध्ये ‘अमिताभ बच्चन’, ‘ऋषी कपूर’, ‘धर्मेंद्र’ यांसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे.
https://twitter.com/bb_thorat/status/1375081024741249026
आशा यांनी आतापर्यंत अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी भाषेतही अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’, ‘ओ मेरे सोना रे सोना’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दो लफ्जो की है’, ‘किताबे बहुत सी’, ‘एक में और एक तू’, ‘बुगडी माझी सांडली गं’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.@ashabhosle pic.twitter.com/em4WLwQnW3
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 25, 2021
त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यात ‘पद्मविभूषण’, ‘फिल्मफेअर’, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, ‘झी सिने अवॉर्ड फॉर द बेस्ट सिंगर’ यांसारख्या अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आशा यांची बहीण गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यादेखील दिग्गज गायिका आहेत. त्यांनीही आपल्या आवाजानेे चाहत्यांना वेडे केले आहे.
याव्यतिरिक्त आशा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांची दोन लग्नं झाली आहेत. त्यांचे पहिले लग्न हे गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते, तर दुसरे लग्न हे दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी झाले होते. बर्मन यांच्याशी लग्न झाल्यानंतरही त्यांनी आपले आडनाव बदलले नाही. त्यांनी आपले पहिले आडनाव भोसले हेच कायम ठेवले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक
-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर