Friday, December 8, 2023

दु:खद! ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते-दिग्दर्शक फारुख मेहता यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा

ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक फारूख मेहता यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा अभिनेते झाेपलेले हाेते. या अभिनेत्याच्या पश्चात त्यांची पत्नी विजया मेहता या आहेत. त्या मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. याशिवाय त्यांना अनाहिता उबेरॉय ही मुलगी आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्यांची मुलगी अनाहिता हिने दिली आहे.

अनाहिता म्हणाली की, ‘एवढ्या वयानंतरही ते घरातील सर्वात लहान सदस्य होता. कारण, त्यांची स्प्रिट आणि कर्टसी अशाप्रकारे हाेती.’ अनाहिताने सांगितले की, ‘ती आणि तिचे वडील पुढील वीकेंडला मुंबईतील इंग्लिश थिएटरमध्ये वर्चुअली बातचीत करणार होते.’ तिने सांगितले की, ‘ती अजूनही तिच्या वडिलांसाठी हे करेल.’

फारुख मेहता यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत 30 हून अधिक इंग्रजी नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. यामध्ये गिरीश कर्नाड यांचा ‘आयकॉनिक तुगलक’, एडवर्ड अल्बीचा ‘द जू स्टोरी’, प्रताप शर्माचा ‘अ टच ऑफ ब्राइटनेस’ आणि आर्थर मिलरचा ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ यांचा समावेश आहे. त्यांनी थिएटर ग्रुप बॉम्बे (TGB) साठी आणखी सात नाटकांचे दिग्दर्शन केले, ज्यात फारूक, पर्ल अॅन्ड अॅलिक पदमसी’ आणि गेर्सन दा कुन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय त्यांनी गुजराती नाटके आणि काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.(veteran theatre actor director farrokh mehta passed away know)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
‘कृष्णधवल’ फिल्टरमध्ये रिंकू राजगुरुचं मोहक साैंदर्य, एकदा पाहाच

हे देखील वाचा