बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणात जामीन मिळाला आहे. तो ६४ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. मुंबईच्या न्यायालयाने सोमवारी (२० सप्टेंबर) राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता. यानंतर आता त्याचा मुलगा वियान कुंद्राची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तो त्याची आई शिल्पा शेट्टी आणि बहिणीसोबत दिसत आहे आणि त्याने त्याचे आयुष्य गणपतीशी जोडून सादर केले आहे.
वियान कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “आयुष्य हे गणपती बाप्पाच्या सोंडेसारखे आहे. त्रास त्याच्या उंदराएवढा लहान आहे, प्रत्येक क्षण त्याच्या मोदकासारखाच गोड आहे. गणपती बाप्पा मोरया.” वियान कुंद्राच्या या पोस्टवर नेटकरी बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.
मुंबई न्यायालयाने राज कुंद्राला ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. १९ जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवून मोबाइल ऍपवर प्रदर्शित केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रानुसार, राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितले की, तिला राजच्या कामांची माहिती नव्हती. कारण ती तिच्या कामात व्यस्त होती. शिल्पा म्हणाली की, “मी माझ्या कामात व्यस्त होते आणि राज कुंद्रा काय करत आहे याची मला कल्पना नव्हती.”
शिल्पानेही केली होती पोस्ट शेअर
राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीने लगेच सोशल मीडियावर एक सकारात्मक पोस्ट शेअर केली होती. असे दिसते की, अभिनेत्रीनेही या बातमीनंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्राम स्टोरीवर संध्याकाळी आकाशातील इंद्रधनुष्याचा फोटो शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इंद्रधनुष्य अस्तित्वात यासाठी आहे की, वाईट वादळानंतरही सुंदर गोष्टी घडू शकतात हे दाखवण्यासाठी आहे.”
पती राज कुंद्रा तुरुंगात गेल्यानंतर शिल्पा पूर्णपणे तुटली होती. तिने कामातून सुट्टीही घेतली होती आणि सोशल मीडियापासून काही काळ अंतरही ठेवले होते. यानंतर अभिनेत्रीने स्वतःला धैर्य दिले आणि तीही कामावर परतली. सध्या ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ३’ मध्ये परीक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेत्रीचा ‘हंगामा २’ हा चित्रपटही काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू
-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना










