Friday, July 12, 2024

एक नंबरने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे आयुष्य केले उद्ध्वस्त, आता दिवसरात्र होतंय टॉर्चर

कधी कधी एखादी छोटीशी गोष्टही किती जड जाते, याचा पुरावा एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलेला प्रसंग. या टीव्ही अभिनेत्रीचा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, त्यानंतर या अभिनेत्रीला सतत टॉर्चर केले जात होते.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘मैं तेरा यार हूं’ची अभिनेत्री विभूती ठाकूर (Vibhhuti Thakur) आहे. अलीकडे एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना, अभिनेत्री म्हणाली, “मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आणि मॅसेज येऊ लागले. सुरुवातीला मला वाटले कोणीतरी माझ्यासोबत मस्ती करत असेल.” यासोबतच विभूती ठाकूर म्हणाली की, “जेव्हा लोक माझ्याकडून सेक्शुअल फेवर्स मागू लागले, तेव्हा मी भावनिकरित्या तुटले होते. मला खूप मोठा धक्का बसला, कारण मी आजपर्यंत अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता.” (vibhhuti thakur phone number leaked says people asking for adults chats)

कॉलरने केला खुलासा
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी एका कॉलरला कळवले. त्याने मला सांगितले की, माझा नंबर एखाद्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लीक झाला आहे. ज्याच्याकडे माझा नंबर होता, त्याने प्रत्येकाला मला कॉल करून सेक्शुअल चॅट करण्यास सांगितले. या गोष्टीनेच मला भावनिकरित्या अस्वस्थ केले.”

अभिनेत्रीने केली सायबर तक्रार
विभूती ठाकूर म्हणाली, “मला येत असलेल्या या घान कामामुळे, घाणेरड्या मेसेज आणि कॉल्समुळे मी इन्स्टा पेजवर तक्रार करणार आहे. माझा नंबर ज्याने लीक केला आहे, मला आशा आहे की सायबर पोलिस त्या सर्वांवर कारवाई करतील.”

विभूती ठाकूर हिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले, “माझ्यावर भावनिक शोषण झाले आहे. पण मी एक मजबूत स्त्री आहे. कधीकधी देव तुम्हाला त्या गोष्टींचा सामना करायला लावतो, जेणेकरून तुम्ही इतरांसाठी लढू शकता. या कठीण काळात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. मी त्या लोकांची देखील आभारी आहे, जे मला सतत असे मेसेज पाठवतात. ज्यामुळे मला आणखी धैर्य मिळते. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.”

अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरीही या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हे देखील वाचा