टेलिव्हिजन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विकी अरोरा नुकतेच ऍमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘अक्कड बक्कड रफ्फू चक्कर’ मध्ये दिसला होता. या सीरिजचे राज कौशल यांनी दिग्दर्शन केले होते. दिग्दर्शक म्हणून राज कौशल यांची ही शेवटची सीरिज होती. या सीरिजमधील विकीच्या कामाचे खूप कौतुक झाले. या दरम्यान विकी अरोराने इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत विकीने दिवंगत दिग्दर्शक राज कौशल आणि इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल सांगितले आहे. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर विकी अरोराला या जास्त बजेट असणाऱ्या सीरिजमध्ये काम मिळाले, ज्यात तो मुख्य भूमिकेत होता. याबद्दल विकीने सांगितले की, “मी देवाचे आभार मानतो की, त्याने माझ्यावर एवढे प्रेम दाखवले. माझ्या आयुष्यात आणि माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप धन्यवाद.” (Vicky Arora opens up on casting couch said who harassed Ranveer singh that guy misbehaved with me)
त्याने पुढे सांगितले की, “समुद्रात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची गणना होत असते आणि मी त्या लोकांना कधीच विसरणार नाही, ज्यांनी माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे. इथपर्यंत पोहोचायला मला ६२१० ऑडिशन द्यावे लागले आहेत. कितीतरी नकार, नऊ वर्ष, आत्मविश्वास तुटणे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.” यानंतर त्याने कास्टिंग काऊचबद्दल सांगितले की, त्याला या सगळ्याचा सामना करावा लागला आहे.
विकीने सांगितले की, “याचा खुलासा २०१५ मध्ये रणवीर सिंगने केला होता. त्याच घटनेत मला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. रणवीर सिंगला त्रास देणारा तोच निर्लज्ज माणूस माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी नाही बोललो, तेव्हा एका प्रेमीप्रमाणे त्याचे हृदय तुटले होते.”
राज कौशल यांच्याबाबत बोलताना विकीने सांगितले की, “त्यांचे हास्य असे होते जे मोकळ्या मनाने सगळ्यांचे स्वागत करत असे. ते खूपच चांगले होते. त्यांच्यामुळे सगळेच खूप खास फील करत होते. मी राज कौशल यांच्यासोबत काही ऍड फिल्ममघ्ये काम केले होते. त्यांना माझ्यातील कौशल्य माहित होते. २०२० मध्ये जेव्हा मला त्यांचा कॉल आला, तर मी एकदम आश्चर्यचकित झालो. त्यांनी सांगितले होते की, “बडी मी एक शो बनवत आहे. एका पात्राचे नाव आहे भार्गव आणि ते तू करणार आहे.”
विकीने सांगितले की, त्यांचे हे बोलणे ऐकून मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत
-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग