बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हे सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सध्या हे जोडपे राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये त्यांच्या लग्नाच्या विधींचा आनंद घेत असून, विकी आणि कॅटरिना गुरुवारी (९ डिसेंबर) लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने आपले लग्न पूर्णपणे गुप्त ठेवण्यासाठी अनेक व्यवस्था केल्या आहेत.
लग्न गुप्त राहण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टी लीक न होण्यास्तही या जोडप्याने त्यांच्या लग्नात ‘नो फोन पॉलिसी’ लागू केली आहे. या अंतर्गत या लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांना समारंभात फोन घेऊन जाण्याची परवानगी नसेल. माध्यमांतील वृत्तानुसार, विकी आणि कॅटरिनाने त्यांच्या सर्व पाहुण्यांना लग्नाच्या विधी दरम्यान फोन घेऊ नका किंवा इंटरनेटवर कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका अशी विनंती केली होती. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या कलाकारांना वधूवराच्या वेशात पाहण्यासाठी चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
माध्यमांतील वृत्तामध्ये असा दावा केला जात आहे की, विकी आणि कॅटरिनाने त्यांच्या लग्नाचे फुटेज ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकले आहेत. या दोघांनी त्यांच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ आणि फोटो ओटीटी प्लॅटफॉर्म असणाऱ्या अमेझॉन प्राईम व्हिडिओला ८० कोटी रुपयांना विकले आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना या जोडप्याचा शाही विवाह थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
त्याचवेळी, जोडप्याने लग्न समारंभात सर्व पाहुण्यांना फोन आणू नका असे सांगितले आहे. काही वृत्तामध्ये असे सांगण्यात आले की, विकी आणि कॅटरिनाने सर्व पाहुण्यांसोबत करारही केला असून, त्यानुसार, ते परवानगीशिवाय लग्नाचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करू शकत नाहीत.
कॅटरिना आणि विकी गुरुवारी ( ९ डिसेंबर) दुपारी सप्तपदी चालणार आहेत. यानंतर रात्री डिनर आणि पूल पार्टी होईल. मंगळवारी (७ डिसेंबर) रोजी संगीत सोहळा बुधवार (८ डिसेंबर) रोजी मेहंदी सोहळा पार पडला. विकी आणि कॅटरिनाचा मेहंदी सोहळा कोर्टीन रेस्टॉरंटच्या अंगणात पार पडला. र्प्त माहितीनुसार या ठिकाणची सजावट विशेष होती आणि पिवळी थीम ठेवण्यात आली होती. विकी आणि कॅटरिनाची मेहंदी एकत्र झाली. यादरम्यान विकीने मरून रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर कॅटरिनाने गुलाबी फ्लॉवर डिझाइनसह मरून रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
हेही वाचा-