बॉलिवूडमध्ये लग्न समारंभाचा सीझन सुरू झाला आहे. लाखो चाहत्यांची धडकन असणारी कॅटरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या जोरात रंगत आहे. कॅटरिना कैफच्या लेहेंग्यापासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत सर्व काही ठरले असून, नक्कीच हे लग्न बॉलिवूडमधील हेव्ही बजेट लग्नांपैकी एक असणार आहे. त्याची तयारीही खास पद्धतीने करण्यात आली आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत असून, दोघेही याच वर्षी लग्न करणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार नसले तरी ते भव्य पद्धतीनेच लग्न करणार आहे.
दोघांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर विकीचा नुकताच ‘सरदार उधम सिंग’ सिनेमा प्रदर्शित झाला असून, याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर कॅटरिना सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याआधी दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची बातमी होती, मात्र आता हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार नसल्याचे बोलले जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, दोघेही डेस्टिनेशन वेडिंगऐवजी राजेशाही थाटात लग्न करणार असल्याचे समजत आहे. खरं तर, दोघेही त्यांच्या कामाच्या कमिटमेंटमुळे डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत. कारण डेस्टिनेशन वेडिंगमध्ये बरेच दिवस जातात. दोघांकडे आता खूप काम असून त्यांना काम आणि लग्न यांचा समतोल राखायचा आहे. त्यामुळे लग्नानंतर दोघांनाही लगेच कामावर परतावे लागेल.

त्यामुळे आता विकी आणि कॅटरिना भारतातच लग्न करणार असून ते लग्न रॉयल असणार यात शंका नाही. कॅटरिनाला महाराणीच्या स्टाईलमध्ये तयार व्हायचे असून, तिच्या लग्नातील लेहेंग्यापासून ते दागिन्यांपर्यंत सर्व काही पारंपारिक असणार आहे. लग्नासाठी तिने कामातून एक महिन्याची सुट्टीही घेतली असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच, कॅटरिनाची बहीण आणि आईही राजस्थानमध्ये शॉपिंग करताना दिसल्या. तिला राजस्थानची संस्कृती खूप आवडते, त्यामुळे ती त्याच स्टाइलमध्ये रॉयल लग्न करू शकते. या वर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्न करू शकतात, असे बोलले जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, दोघांच्या लग्नाचे फंक्शन १ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?
-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी