Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अफेअरच्या चर्चामध्ये समोर आला व्हिडिओ, एकमेकांना मिठी मारताना दिसले विक्की आणि कॅट

विक्की कौशल नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यात मग्न आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग १४ ऑक्टोबर रोजी झाले. त्यात कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि इतर काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण यावेळी मुख्य आकर्षण ठरली कॅटरिन कैफ. स्क्रीनिंगमध्ये कॅटरिनाला तिचा कथित बॉयफ्रेंड विक्की कौशलला सपोर्ट करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

या दरम्यान दोघांचेही अनेक फोटो समोर आले होते. मात्र कोणत्याही फोटोमध्ये हे एकत्र दिसले नव्हते. यामुळे दोन्ही स्टार्सचे चाहते निराश झाले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे, कथित जोडप्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये विक्की आणि कॅटरिना एकमेकांना चक्क मिठी मारताना दिसत आहेत. (vicky kaushal and katrina kaif video came out both were seen hugging each other)

अनेक चाहते व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हार्ट इमोजी शेअर करून जोडप्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी हा जोडप्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असल्याचे म्हटले आहे. यावेळी अभिनेत्रीने डेनिम स्कर्टसह स्वेटशर्ट घातला होता. विक्की पांढऱ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला. तर दोघांनीही लेदर बूट घातले होते.

शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला. कॅटरिना त्या लोकांपैकी एक होती, ज्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आणि विक्कीचे कौतुकही केले.

पोस्ट शेअर करत, कॅटरिनाने लिहिले होते की, “शुजित सरकार काय नजरिया आहे, इतका मनोरंजक सुंदर चित्रपट आणि कथा. विक्की कौशल प्युअर टॅलेंट आहे.” शिवाय तिने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. विकीनेही कॅटरिनाची ही पोस्ट शेअर केली आणि तिचे आभार मानले. विक्की आणि कॅटरिनाने अद्याप डेटिंग करत असल्याची पुष्टी केलेली नाही. मध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण विक्कीने हे नाकारले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफसोबतच्या नात्यावर विक्की कौशलने तोडले मौन; म्हणाला, ‘लवकरच लग्न करेन’

-कथित बॉयफ्रेंड विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटावर कॅटरिना कैफने उधळली स्तुतीसुमने, म्हणाली…’

-कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत

हे देखील वाचा