काही दिवसांपासून मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या अफेयरच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यात नुकताच या दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या आल्या आणि सगळीकडेच जोरदार धमाका झाला. सोशल मीडियावर तर या दोघांच्या फॅन्सने त्यांना शुभेच्छा द्यायला देखील सुरुवात केली. पण याबाबत अधिकृत माहिती दोघांकडूनही आली नव्हती. त्यामुळे एकीकडे लोकांना आनंद झाला असला तरी दुसरीकडे या बातम्या किती खऱ्या आहेत, याबाबत साशंकता होती. मात्र आता या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने याबातम्यांबद्दल खुलासा केला आहे.
एका मोठ्या वेबपोर्टलनुसार कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर आता खुद्द विकी कौशलच्या वडिलांनीच स्पष्टीकरण दिले आहे. हो, शाम कौशल यांनी नुकतच याबाबत सांगतात म्हटले की, या सर्व बातम्या खोट्या आणि अफवा आहेत. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. त्यासोबतच अशा अफवा न पसरवण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (vicky kaushal katrina kaif roka ceremony?)
मागील बऱ्याच दिवसांपासून कॅटरिना आणि विकीबद्दल बातम्या येत होत्या. मीडियामध्ये सतत या दोघांच्याच चर्चा होत आहेत, त्यामुळे साखरपुड्याची बातमी आल्यानंतर नक्कीच सर्वाना आनंद झाला, मात्र आता विकी कौशलच्या वडिलांच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या फॅन्सचा भ्रमनिरास झाला आहे. सोशल मीडियावरवरून दोघांच्या साखरपुड्याची बातमी पसरवली गेली.
इंस्टाग्राम अकाउंटवरील विरल भियाना या अकाऊंटवरून कॅटरिना आणि विकीचा एक फोटो पोस्ट केला होता ज्यात त्यांनी ‘रोका कार्यक्रम केल्याची अफवा उडवली गेल्याची माहिती दिली होते. मात्र थोड्याच वेळचे या अकाऊंटवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली. या पोस्टमध्ये पुढे लिहिले गेले, “कॅटरिनाला काल बांद्रा येथे स्पॉट केले गेले होते.” मात्र पुढच्या काही वेळातच ही पोस्ट डिलीट कऱण्यात आली. अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धनने देखील ते नात्यात आल्याचे सांगितले होते.
कॅटरिना आणि विकी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर कॅटरिना तिच्या आगामी ‘टायगर ३’च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे, तर विकी देखील ‘मिस्टर लेले’च शूटिंग करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?










