Tuesday, March 3, 2026
Home बॉलीवूड कॅटरिना कैफ तर सोडाच, विकी कौशल्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे सौंदर्य पाहून तुम्हालाही पडेल भूरळ

कॅटरिना कैफ तर सोडाच, विकी कौशल्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे सौंदर्य पाहून तुम्हालाही पडेल भूरळ

अभिनेता विकी कौशल या दिवसात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. कॅटरिना कैफसोबत असणाऱ्या त्याच्या रिलेशनमुळे तो चर्चेत आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत अशा देखील चर्चा चालू आहेत. कॅटरिनाच्या आधी विकी अभिनेत्री आणि अँकर हरलीन सेठीसोबत रिलेशनमध्ये होता. सौंदर्याच्या बाबतीत हरलीन कॅटरिनालाही टक्कर देते. अशातच विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नाच्या चर्चेत त्याची एक्स गर्लफ्रेंड अचानक प्रकाशझोतात आली आहे. विकी हा ‘उरी’ चित्रपटाच्या आधी काही महिने हरलीनसोबत रिलेशनमध्ये होता. २०१९ पर्यंत ते रिलेशनमध्ये होते. परंतु ‘उरी’ प्रदर्शित झाल्यानंतर ते वेगळे झाले.

ब्रेकअपनंतर हरलीन सेठीने एक कविता लिहिली होती. तिने लिहिले होते की, “मी जिथून सुरुवात केली होती आणि आज मी जिथे आहे, ते दोन्ही रस्ते मी स्वतः बनवले आहेत. निर्भीडपणे मी या माझ्या इच्छांचे स्वागत केले आहे. मी स्वतःला एका मोठ्या तलावात एका माशाच्या रूपात पाहिले आहे. ब्रेकअप मला तोडू शकत नाही. तसेच कोणतेही यश माझी जखम भरून काढू शकत नाही. हार मला मारू शकत नाही. मी स्वतःला पूर्णपणे ओळखते. माझा स्वतःचा एक अंदाज आहे. मी स्वतःसाठी एक टॅग आहे.” तिची ही कविता खूप व्हायरल झाली होती. (vicky kaushal ‘s ex girlfriend harleen sathi’s photos, know the reason of their breakup )

हरलीनने हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या सुंदर फोटोंनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांचे मन जिंकत असते. हरलीनचे सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल की, ती कॅटरिनाला टक्कर देते. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘गुडटाइम्स’ या शोमधून केली होती. त्यानंतर ती अनेक जाहिरातीत दिसली. मग तिने टेलिव्हिजनवर एन्ट्री मारली.

तिने ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ मध्ये देखील काम केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार हरलीनने त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगताना सांगितले होते की, उरी चित्रपटानंतर विकी खूप बदलला होता. तिने इंस्टाग्रामवर देखील विकीला अनफॉलो केले होते. हरलीन आणि विकीने त्यांच्या ब्रेकअपवर वक्त्यव्य केले नाही. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला कोणाची तरी एक्स गर्लफ्रेंड म्हणणे चुकीचे आहे. या गोष्टीचा तिला काहीही फरक पडत नाही परंतु तिच्या कुटुंबाला या गोष्टीचा खूप फरक पडतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफला विकी कौशलच्या आईकडून मिळालं स्पेशल गिफ्ट! लग्नाच्या बातम्यांनी धरला जोर

-तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

-विकी कौशल आणि कॅटरिना राजस्थानमध्ये राजेशाही थाटात करू शकता लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन रद्द

हे देखील वाचा