बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून विकी कौशल ओळखला जातो. आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमधे स्थान निर्माण करत यश मिळवले आहे. आज टॉपच्या अभिनेत्यांमध्ये विकीचे नाव घेतले जाते. विकीने आतापर्यंत कॉमेडी, ऍक्शन, हॉरर आदी बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याने एकही ऐतिहासिक भूमिका केली नाही. आता मिळणाऱ्या एका माहितीनुसार विकी लवकरच एका मोठ्या ऐतिहासिक सिनेमात काम करताना दिसणार आहे. विकीकडे आधीच तख्त आणि इमोर्टल अश्वत्थामा हे दोन ऐतिहासिक सिनेमे असून यात आता अजून एका सिनेमाची भर पडणार आहे.
प्राप्त होणाऱ्या एका माहितीनुसार विकी कौशल लवकरच ‘छत्रपती संभाजी महाराज’ ही भूमिका साकारताना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव असलेले छत्रपती संभाजी महाराज हे देखील त्यांच्या सारखेच राजे होते. आता त्यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार असून, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार असला अशा बातम्या जरी समोर येत असल्या तरी अजून विकी कौशल कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
View this post on Instagram
बॉलिवूडमधील अतिशय हुशार आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उत्तेकर यांना ओळखले जाते त्यांनी ‘मिमी’, ‘लुका छुपी’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून, दोन्ही सिनेमे सुपरडुपर हिट झाले होते. दरम्यान मिळणाऱ्या माहितीनुसार सिनेमाचे लेखन पूर्ण झाले असून, लवकरच हा सिनेमा फ्लोवर जाईल. मात्र सध्या सर्वांना या सिनेमाबाबत अधिकृत माहिती मिळण्याची आस आहे.
तत्पूर्वी विकीचा काही दिवसांपूर्वी ‘गोविंदा मेरा नाम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता तो त्याच्या आगामी ‘सॅम बहाद्दर’ चित्रपटामुळे लाइमलाईट्मधे असून, या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहाद्दर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचे एक पोस्टर आधीच समोर आले असून, ते चांगलेच गाजले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री
केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ










