Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘उरी’नंतर आणखी एका आर्मी चित्रपटात झळकणार विकी कौशल, सिनेमाचं नाव झालं जाहीर; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

‘उरी’नंतर आणखी एका आर्मी चित्रपटात झळकणार विकी कौशल, सिनेमाचं नाव झालं जाहीर; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत दिसत आहे. त्याच्या ‘उरी’ या सैनिकी चित्रपटासाठी आजही प्रेक्षक त्याचे कौतुक करतात. विकीला ‘उरी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुुरस्कार दिला आहे. विकी नेहमीच वेगळा विषय असणारे चित्रपट करत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. विकीचा सॅम मानेकशाॅ यांच्यावर आधारित आगामी चित्रपटाची आता सर्वजण वाट बघत आहे. सॅम मानेकशॉ याच्या आयुष्यावर ही एक बायोपिक आहे. नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.

आपल्या देशाची शान सॅम मानेकशॉ याच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. या बायोपिकचे नाव ‘सॅम बहादुर’ हे आहे. यामध्ये विकी कौशल, रॉनी स्क्रूवाला, मेघना गुलझार यांसारखे कलाकार असणार आहे.

सॅम हे भारतातील एक महान योद्धा होते. या चित्रपटात सॅम मानेकशाॅ यांच्या मुख्य भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. मेघना गुलझार या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत.

विकी कौशलने या चित्रपटाची माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या पात्रावर आता सगळ्यांची नजर खिळली आहे. त्याने चित्रपटातील त्याचा लूक आधीच प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याच्या या लूकने सगळ्यांना त्याच्याकडे आकर्षित केले आहे.

विकी कौशलने इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे नाव घोषित करताना एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे विज्युअल पाहायला मिळतात. तसेच बॅकग्राउंडमध्ये एक आवाज देखील ऐकू येतो. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “अनेक नावं घेतली गेली, पण ते एक नाव आमचं झालं.” या सोबतच त्याने लिहिले की, “मनुष्य, कथा, बहादुर दिल, आमचा सॅम, त्यांच्या जयंतीनिमित्त चित्रपटाचे नाव शोधले.”

या व्हिडिओला गुलझार यांचा आवाज दिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. सगळेजण या व्हिडिओचे खूप कौतुक करताना दिसत आहे. तसेच या चित्रपटाबाबत प्रेेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके

-तब्बल ७ कोटी रुपयांच्या गाडीत बसण्यापूर्वी ‘सिंघम’ अजय देवगणने फोटोग्राफरला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

हे देखील वाचा