Thursday, July 24, 2025
Home बॉलीवूड ना अभिनेता, ना क्रिकेटर…मृणाल ‘या’ घटस्फोटित रॅपर आणि गायकाला करते डेट? व्हिडिओ व्हायरल

ना अभिनेता, ना क्रिकेटर…मृणाल ‘या’ घटस्फोटित रॅपर आणि गायकाला करते डेट? व्हिडिओ व्हायरल

बी-टाऊनमध्ये मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी झाली. दिवाळीच्या दिवशी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या घरी ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह अभिनेत्री मृणाल ठाकूरचा हात धरून दाखल झाला होता . त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीचा एक फोटो मृणाल ठाकूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये ती बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबत पोज देताना दिसली होती. बादशाहनेही मृणालचा हा फोटो पुन्हा पोस्ट केला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टींच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. मृणाल (Mrinal Thakur) आणि बादशाह एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु असली तरी मृणालने या अफवांवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र बादशाहने मात्र या अफवांवर मौन तोडत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “आता समजण्याचा प्रयत्न करा, नाणं फेकलं गेलं आहे.” या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

तर बादशाह बद्दल बोलायचं झालं तर, मृणालच्या आधी बादशाहचे नाव पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबतही जोडले गेले होते. बादशाहने 2012 मध्ये जास्मिन मसिहसोबत लग्न केले, पण 8 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @donyoutubechannel

 वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मृणाल ठाकूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पिप्पा’ या चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये इशान खट्टर, प्रियांशू पैन्युली, सोनी राजदान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. (Video of Actress Mrinal Thakur and Rapper Badshah at Shilpa Shitty Diwali Party Goes Viral)

आधिक वाचा- 
Children’s Day 2022: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, ‘ही’ फिल्मी गाणी ऐकत बनवा तुमचा बालदिन खास
खान अभिनेता वादाच्या भोवऱ्यात; ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी FIR दाखल? एकदा वाचा

हे देखील वाचा